शरद सातपुते, सांगली:
Sangli ZP Election 2026: राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रभर मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. अशातच सांगलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीमधील बलगवडे गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
सांगलीमध्ये मतदानावर बहिष्कार...!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
सकाळपासून एकही मतदान नाही..
मात्र यासाठी बेकायदेशीर रित्या गावकऱ्यांनी लावलेली झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय केला होता. त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांनी कडून बहिष्कार घालण्यात आला आहे.आणि गावं बंद ठेवले आहे.
दरम्यान, बलवडे गावात 2300 इतके मतदान आहे. दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र दुपारपर्यंत या गावामध्ये एकही मतदान झालेले नाही. गावकऱ्यांच्या या निर्णयाबाबत आता प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी काय तोडगा काढणार? गावकऱ्यांची कशी समजूत काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BMC Mayor: मुंबई महापौरपदाच्या उमेदवार ठरल्या! भाजपकडून घोषणा; शिवसेनेकडे उपमहापौरपद