जाहिरात

BMC Mayor: मुंबई महापौरपदाच्या उमेदवार ठरल्या! भाजपकडून घोषणा; शिवसेनेकडे उपमहापौरपद

Mumbai Mayor And Deputy Mayor Name: शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी संजय शंकर गाडी यांचे नाव देण्यात आले आहे. सव्वा वर्षासाठी संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील. 

BMC Mayor: मुंबई महापौरपदाच्या उमेदवार ठरल्या! भाजपकडून घोषणा; शिवसेनेकडे उपमहापौरपद

Ritu Tawde Mumbai Mayor: मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मुंबईच्या महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. रितू तावडे या महायुतीच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील. आज त्या महापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. 11 तारखेला याबाबतचा निकाल लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी संजय शंकर गाडी यांचे नाव देण्यात आले आहे. सव्वा वर्षासाठी संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील. 

नक्की वाचा: Ritu Tawde Mumbai Mayor Candidate: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?

रितू तावडे होणार मुंबईच्या महापौर? शिवसेनेकडे उपमहापौरपद

मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी आज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ आहे.  BMC च्या भाजपा पक्ष कार्यालयात सकाळी ९:३० वाजता सर्व नगरसेवक जमा झाले. त्यानंतर अमित साटम यांच्याकडून मुंबई महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष कार्यालयात विधिवत पूजा करून मंत्रोच्चाराच्या घोषात महापौर पदाची उमेदवार नगरसेविका आपला अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. 

ZP Elections: धक्कादायक! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लहान मुलाकडून मतदान केल्याचा संशय

कोण आहेत रितू तावडे? 

रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 2012 मध्ये घाटकोपर प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडणूक लढवली अन् त्या निवडून आल्या. त्यानंतर 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता. आत्ता त्या प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.  त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 

नक्की वाचा-  Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसेंसह पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, प्रकरण काय?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com