शरद सातपुते, सांगली:
Maharashtra Kesari Sikandar Shaikh Car Accident: सांगोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता सिकंदर शेख याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर ही दुर्घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे.
Pune News: पुण्यात खळबळ! महापौर कार्यालय तातडीने रिकामं केलं, पोलीस यंत्रणा अलर्ट, नेमकं काय घडलं?
सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज मार्गावर आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातात ते बालंबाल बचावले आहेत. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
सिकंदर शेख हे आपल्या प्रवासानिमित्त सांगोला-मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. रस्ता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे समोरचे आणि बाजूचे भाग पूर्णपणे चक्काचूर झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
दरम्यान, सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर देशभरातील प्रसिद्ध मल्लांना आस्मान दाखवत सिकंदर शेखने कुस्तीच्या मैदानात आपला दबदबा निर्माण केला आहे. सिकंदरने महाराष्ट्र केसरीसह अनेक मानाच्या स्पर्धा जिंकत कुस्ती क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.