Sangli Politics: ZPच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का! खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश; सांगलीत पक्षाला खिंडार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली:

Sangli Politics:  महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकांचे धुमशान सुरु असतानाच सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपने जोर का झटका दिला आहे. 

सांगलीत स्वाभिमानी संघटनेला मोठे खिंडार

 सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपाने मोठे खिंडार पाडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे.

Pune News: 'हे नेते दळभद्री यांनी लोकांवर अन्याय केलाच पण देवांवर ही अन्याय केला'

राजू शेट्टींचे खंदे समर्थक मानले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आपल्या शेकडोस समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.या पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी डावे- आणि उजवे असे काही नसतं असं सांगत या पक्ष प्रवेशामुळे आपल्याला मोठा आनंद झाल्याचे भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

सांगली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होणार...

दुसरीकडे, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार सांगलीमध्ये पार पडला.  सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात तोडून आलेल्या भाजपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला आहे. उपस्थित भाजपा नगरसेवकांना नीट काम करा,असा सल्ला वजा कानमंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नक्की वाचा - Pune News: पुण्यात किती उमेदवारांची डिपॉझिट झाले जप्त? डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे?

दरम्यान,  सांगली महापालिकेत भाजपाचाच महापौर होईल असे स्पष्ट केला आहे. सत्कार सोहळा प्रसंगी भाजपाचे आमदार सुधीर गाडगे सुरेश खाडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे नेते व आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement