शरद सातपुते, सांगली:
Sangli Tadkadtai Tradition Special Story: सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची नसून हि दहशत आहे तड्कडताईची. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते. या तड्कड ताईची दहशत कशी आहे? वाचा..
आरारा खतरनाक..! भुताची आई तडकडताई
अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी हि आहे तड्कडताई. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकड ताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे.
Mumbai Alert: मुंबईकरांनो सावधान! जुलै महिना धोक्याचा... 'या' तारखा लक्षात ठेवा; BMCकडून मोठा अलर्ट
कर्नाटकमधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्ठ, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.. दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते, त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गावांमध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते.
काय आहे परंपरा?
सांगली शहरात जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी ४ वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तड्कडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात, सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे.
Rain News: मान्सून गायब! पावसाचे दमदार कमबॅक कधी होणार? हवामान विभागाच्या इशाऱ्याने चिंता वाढली