Sanjay Raut on Jayakumar Gore : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर महायुतीतील इतर मंत्रीही विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपच्या एका मंत्र्याविरोधात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना या मंत्र्यावर मोठा आरोप केला आहे. स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येत आहे. महायुतीतील मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. जयकुमार गोरेसारखे विकृत मंत्र्याला लाथ मारली पाहिजे, असं म्हणत राऊतांनी गोरेंवर घणाघात केला. याशिवाय विजय वडेट्टीवार यांनीही नाव न घेता जयकुमार गोरेंवर मोठे आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊतांचा आरोप काय?
पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले होते. ही महिला शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील आहे. आता मंत्री झाल्यावर ते महिलेला त्रास देत असल्याचं राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. लवकरच ही महिला विधानभवनाबाहेर उपोषणला बसणार असल्याचीही ते म्हणाले.
नक्की वाचा - Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा
मुख्यमंत्र्यांना थेट सवाल...
महायुतीमध्ये काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची मोठी यादी आहे. अशांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे पत्ते पुन्हा पिसले पाहिले. त्यांनी निवडलेली ही रत्नं पुन्हा तपासली पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती भयंकर आहे. मुख्यमंत्र्यांनी अशांना मंत्रिमंडळात का ठेवलं?
जयकुमार गोरेंसारख्या विकृत मंत्र्याला लाथ मारली पाहिजे.
देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच मंत्र्यांना दम भरला
दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीत सर्व मंत्र्यांना दम भरला आहे. त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोल देखील सुनावले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या दिवशीच भाजपच्या मंत्र्यांची ही बैठक झाली. त्याच दिवशी या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दर भरला. "तुम्ही मंत्री आहात, त्यामुळे जनतेला आणि आमदारांना सन्मानाने वागवा. लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा. मोबाइलवर बोलताना तारतम्य ठेवा. चुकीचे वर्तन केल्यास मंत्रिपदावर गंभीर परिणाम होतील. लोकहिताची कामे आणि चांगल्या योजना शासनासाठी सूचवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत.