मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाचे प्रकाशन प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य सभागृहात पार पडले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी लेखक कवी पटकथाकार जावेद अख्तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी SP अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी जेलमधील किस्से सांगतानाच हे पुस्तक लिहण्यामागचाही हेतूही सांगितला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
"एका मराठी पुस्तकाच्या प्रकाशसनासाठी इतका तुडुंब सभागृह भरले आहे. ही मराठी साहित्याची ताकद आहे. जिथे जिथे अन्याय होईल, चुकीचे घडेल तिथे जावेद साहेब आवाज उठवत असतात त्यामुळे आज त्यांचे इथे असणे महत्त्वाचे आहे. शरद पवारांशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही, पडद्यामागे ते अनेक लढाया आमच्यासाठी लढत असतात, लढत आहेत.शरद तांदळे यांनी एक हिमतीचे काम केले आहे उद्या तुम्ही ईडीचे दरवाजे उघडे ठेवा. पण मी ईडीचे बूच कायमचे लावून ठेवले आहे," अशी कोपरखळी संजय राऊत यांनी मारली.
"आम्ही लिहणारे आहोत, बोलणारेही आहोत. आम्ही वाकणार नाही. आम्ही ठरवलं काहीही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर आपण झुकायचे नाही. तुरुंगात करायचे काय? लिहणे वाचणे चांगला विचार करणे आणि उद्या बाहेर पडू असा विचार करायचा. एखादा सुटला तर तो कसा सुटला त्याचा युक्तीवादाचा अभ्यास करायचा. तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात. आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत कसं चालवायचं हे शिकतो, असेही ते म्हणाले.
नक्की वाचा- मोदी सरकारनं शशी थरुर यांच्यावर सोपावली नवी जबाबदारी, अमेरिकेत फाडणार पाकिस्तानचा बुरखा)
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पुस्तक तयार झाले 80 टक्के पुस्तक तुरुंगात झाले 20 टक्के व्हायला दोन वर्ष गेली. महत्त्वाचं म्हणजे आम्ही कबासच्या बॅरेकमध्ये राहिलो ते बॅरेक जयंत पाटील यांनी बनवले होते. इंजिनियर माणूस.. त्यांनी राज्याचे गृहमंत्री असताना कसाबसाठी बॅरेक बनवले अन् आम्हाला जेलमध्ये पाठवले. पुस्तक कसं आहे हे एका वाक्यात सांगतो, त्यात रडगाणे नाही. ज्यांनी आम्हाला पकडसे त्यांना पश्चाताप झाला. आम्ही गुंड आहोत आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही देशाला अशाच लोकांची गरज आहे."
दरम्यान, "या पुस्तकाचे सार काय आहे हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचे आहे त्याने हे पुस्तक वाचावे. ज्याला सत्तेची चाटूगिरी करायची आहे त्याच्यासाठी हे पुस्तक नाही. आणि महाराष्ट्र गांडू नाही हा संदेश या पुस्तकातून द्यायचा आहे. काही लोकांनी या महाराष्ट्राचा नरक केला आहे आता त्याला स्वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे प्रतिपादनही संजय राऊत यांनी केले.
(नक्की वाचा- NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक)