
Pune News : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटकेतील आरोपी अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान यांना इंडोनेशियामध्ये पकडण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत आणण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोघांना भारतात पाठवण्यात आले आणि मुंबईत अटक करण्यात आली. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही अटक महाराष्ट्र, गुजरात आणि भारतातील इतर भागांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या आयएसआयएसद्वारे प्रायोजित कटाच्या तपासात एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
(नक्की वाचा- अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनींसमोर टेकले गुडघे; VDEO व्हायरल)
NIA च्या माहितीनुसार, आरोपी IED तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित करणे, जंगलांमध्ये फायरींग प्रॅक्टिस व लपण्यासाठी ठिकाणं शोधणे, तसेच सशस्त्र दरोडे आणि चोरीच्या माध्यमातून निधी गोळा करणे अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.
(नक्की वाचा- India-Pakistan : पाकिस्तानला आली शांतीची आठवण; शाहबाज शरीफांकडून चर्चेचा प्रस्ताव)
अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ ‘दियापरवाला' मुळचा पुण्याच्या कोंधव्यातील मितानगर येथील रहिवासी होता. तर तल्हा लियाकत खान वानवडी (पुणे) येथे राहत होता. हे दोघेही गेल्या काही काळापासून फरार होते. त्यांच्या अटकेसाठी NIAने प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.