Dhananjay Munde: '...तर मी लगेच राजीनामा देणार', धनंजय मुंडे आक्रमक; अजित पवारांसमोर स्पष्ट सांगितलं

धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांची माहिती यावेळी पक्षातील नेत्यांना दिली. अंजली दमानियांनी दिलेले सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा.. अशी मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पुरावेही दाखवले. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडला पाठीशी घालत असल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. याबाबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेते आणि धनंजय मुंडेंसोबत बैठक घेतली. या बैठकीतील इनसाईट स्टोरी आता समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काल रात्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. अजित पवार यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतलेली भेट आणि धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांची माहिती यावेळी पक्षातील नेत्यांना दिली. अंजली दमानियांनी दिलेले सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले. 

त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल, माझ्याविषयी काय करायचे ते तेच ठरवतील, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच काहीजण वैयक्तिक राग ठेवून आपल्यावर आरोप करत असल्याचा दावाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या कधी आहे? त्या दिवशी मौनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे काय?

दरम्यान, वाल्मिक कराड प्रकरणी आता थेट  मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीने उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याचं नाव  सातत्यानं येत असल्यानं पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचेही याचिका कर्त्याने म्हटले आहे. याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक संबंधाचा देखील या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आल्याने अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Advertisement