बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संंबंध नसल्याचे म्हणत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. तसेच हत्या करणाऱ्यांची मानसिकताही समजून घ्यायला हवी, असे धक्कादायक विधानही त्यांनी केले होते. नामदेव शास्त्रींच्या या विधानानंतर आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान गडावर जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीमध्ये संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखने नामदेव शास्त्रींच्या त्या वक्तव्यावरुन नाराजी दर्शवत वडिलांसोबत घडलेला प्रसंग किती क्रृर होता याची कहाणीच सांगितली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज दूपारी दीड वाजता भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींची पुरावे असलेले कागदपत्रे दाखवली. या भेटीनंतर आरोपींना भगवानगड पाठीशी घालत नाही माफ करत नाही, असे म्हणत संतोष देशमुख यांच्या पाठीशी भगवान गड उभा आहे, अशी ग्वाही दिली.
यावेळी धनंजय देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखनेही नामदेव शास्त्रींसमोर रडत रडत वडिलांसोबत घडलेल्या भयंकर घटना सांगितली. तुम्ही महंत आहात, आमचे गुरु आहात. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. फक्त मला एवढचं वाटतं, तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापट मारल्यामुळे आरोपींनी असे कृत्य केले, त्यांची मानसिकता समजावून घ्या. पण माझ्या बापाच्या अंगावर अशी एक जागा शिल्लक ठेवली नाही. त्यांच्या अस्थीवेळी केवळ तीन हाडे मिळाली. आमची मानसिकता कोण समजून घेणार? असा सवालही तिने विचारला.
नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा
दरम्यान, यावेळी धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींशी संबंधित 9 महत्वाचे पुरावेही दाखवले. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशी हत्या केली या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे? विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली? याबाबतचे सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांनी दाखवले.