Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग? कट रचून संपवलं; SITचा खळबळजनक दावा

विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये 10  मिनीटे चर्चा झाली असा खळबळजनक दावा यावेळी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Santosh Deshmukh Murder Case:  सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर मकोका लावल्याच्या नंतर आज जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आले. बीडवरून वाल्मीक कराड याला घेऊन एसआयटी पथक बीडच्या जिल्हा न्यायालयात हजर झाले . जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या या सुनावणीत एसआयटीने वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणात संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच महत्त्वाचे पुरावेही दिलेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोर्टात काय घडलं?

बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश सुरेख पाटील यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी  बाळासाहेब कोल्हे  यांनी सरकारी वकील म्हणून तर  अशोक कवडे  यांनी आरोपीचे वकील म्हणून काम पाहिले. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये 10  मिनीटे चर्चा झाली असा खळबळजनक दावा यावेळी तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तसेच हत्येदिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीने केला आहे. 

संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबरला खून झाला. या वेळी दुपारी 3.20 ते 3.30 या दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांचं संभाषण झालं आहे.  SIT कडे याबाबत CDR उपलब्ध असल्याने या खंडणी प्रकरणाचा थेट संबंध हत्येचशी असल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरणाची 3 ते 3.15 दरम्यान  झाले आणि साडेतीन वाजता दरम्यान कराड आणि घुले तसेच विष्णू चाटे यांचा फोन कॉल झाला असं कोर्टात एसआयटीने म्हटले आहे. 

 संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या आरोपींच्या संभाषणाची वेळ मिळती- जुळती आहे. त्यामळे या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक आहे.  तिन्ही आरोपींमध्ये हत्येच्या दिवशी 20 मिनीटे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली. याचा तपास करण्याचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितले. तसेच 10 दिवसांच्या एसआयडी कोठडीची मागणी केली आहे. 

( नक्की वाचा : Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडं मागणी )

दरम्यान, एकीकडे बीड कोर्टात सुनावणी सुरु असतानाच या प्रकरणावरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी निशाणा साधला आहे. आरोपींसाठी शहरे बंद ठेवायची असा नवा पॅटर्न. व्यापारी बंद ठेवून स्वतःचे नुकसान करत आहेत. यामध्ये कोणताही जातीयवाद नाही, यांना मानणारे चार पाच टक्के लोक आहेत त्यांचा हा गुंडावाद आहे, असं सुरेश धस म्हणालेत. 

Advertisement