Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केली आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते रामदास कदम यांनी केली आहे.
मुंबईतील वांद्रे रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर कदम बोलत होते. बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रशासनाचं आहे. या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन ठाकरे यांची हकालपट्टी केली पाहिजे, असा ठराव आम्ही केलाय. तो ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत, असं कदम यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न
राज्यात भाजपा आणि शिवसेची युती आहे. आमचा युतीवर विश्वास आहे काही लोक आता युतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही कदम यांनी केली. उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत... त्यांचं पिल्लू तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतय. संजय राऊत यांची भाषा बदलली आहे. त्यांनी मोदी शहांवर खालच्या पातळीची टीका केली होती., आता त्यांची भाषा बदलली आहे... शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं. ते फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसबरोबर गेले.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली )
पक्षसदस्य नोंदणी
23 जानेवारी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे शिवसेनेचा भव्य मेळावा होईल. या मेळाव्यात मुंबई महानगरपालिकेचे बिगुल फुंकले जाईल. तारखेपासून शिवसेनेचे मुंबईतील सर्व पद रद्द केली जातील. त्यानंतर समिती नेमून त्या त्या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. 24 ते 30 तारखेपर्यंत शिवसेनेची सदस्य नोंदणी घेतली जाईल.मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाईल, असं कदम यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world