1 day ago
मुंबई:

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यातील काही नेते आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसत आहे. काल 6 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या प्रकरणात देशमुख यांची हत्या करीत असतानाचा व्हिडिओ एसआयटीला मिळाला असून यात आरोपी हत्येचा पाशवी आनंद घेत असल्याचं दिसत आहे. यानंतर ते राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात थंडी वाढली आहे.   

Jan 07, 2025 21:47 (IST)

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगेविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी येथे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी काढलेल्या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत शिवीगाळ करत, रस्त्यावरून फिरू न देण्याची व घरात घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्याने मनोज जरांगे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 07, 2025 21:44 (IST)

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत घेणार बैठक

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत होणार चर्चा

सोबतच पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींवर देखील होणार चर्चा

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच केली आहे जाहीर

Jan 07, 2025 20:50 (IST)

"संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही", CM फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन

"संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही", CM देवेंद्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबियांना आश्वासन दिलं. महाराष्ट्राला एक उदाहरण मिळणार आहे की गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही.  या प्रकरणाबाबत आमच्याकडे काही गोष्टी होत्या त्या दाखवल्या आहेत. आम्ही न्यायाची भूमिका मांडली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Jan 07, 2025 20:10 (IST)

ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे इंडिकेटर पडले बंद

ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे इंडिकेटर पडले बंद

इंडिकेटर बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय

कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसाठी प्रवाशांची मोठी गर्दी 

रेल्वेकडून इंडिकेटर बंद असल्याबाबत कोणतीही माहिती नाही

Advertisement
Jan 07, 2025 19:03 (IST)

Accident News : सांगलीत बस आणि ट्रकचा अपघात, 19 विद्यार्थी जखमी

सांगलीच्या तानंग फाटा या ठिकाणी बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. बसमधील 19 विद्यार्थी जखमी झाली आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी कवठेमहांकाळ निवासी शाळेचे विद्यार्थी असून मिरज येथे पार पडत असलेल्या क्रीडा स्पर्धां आटपून माघारी निघाले आहेत. नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील तानंग फाटा येथे वळण घेताना 14 चाकी ट्रक आणि बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Jan 07, 2025 18:28 (IST)

Mumbai News : माघी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी असणार

माघी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी असणार

मुंबई महापालिका प्रशासनाकडून नियमांचे परिपत्रक जाहीर

पीओपीची मूर्ती आणणार नाही, असे लिखित स्वरूपात हमीपत्र मंडळाना महापालिकेकडे सादर करावे लागणार आहे

Advertisement
Jan 07, 2025 17:26 (IST)

उल्हासनगरमध्ये सीएनजी गॅस पाईपलाईन फुटली

उल्हासनगरमध्ये शांतीनगर येथील डॉल्फिन क्लब रोडवर गॅस पाईपलाईन फुटली. सीएनजी पंपासमोर घडली घटना. गॅस पाईपलाईन फुटल्याने  परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. गॅस पसरू नये म्हणून गॅसवर पाण्याचा मारा केला.  महानगर गॅस आपत्कालीन विभागाने तातडीने गॅस पाईपलाईन बंद केली. अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणाखाली आली.

Jan 07, 2025 17:21 (IST)

काँग्रेस गद्दार आणि भाजप महागद्दार, महादेव जानकर यांचा घणाघात

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मी आणि बच्चू कडू स्वतंत्र लढलो. बच्चू कडूंनाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. खासदार जर झालो असतो तर संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते. शेतकरी मेंढपाळ बांधवांना माझी विनंती आहे, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे, असा घणाघात रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी केला आहे. 

Advertisement
Jan 07, 2025 17:19 (IST)

Jalna News : ZP शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप

अंगावर वळ उमटेपर्यंत मुख्याध्यापकाची मारहाण

मुख्याध्यापकाच्या मारहाणीत विद्यार्थ्यांचा हात फॅक्चर

जालन्यातील अंबड तालुक्यातील शहागड जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बसल्याने संतापलेल्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप

Jan 07, 2025 17:15 (IST)

कोल्हापुरातील राधानगरी येथे एसटी वाहकाची दुसऱ्या वाहकाला मारहाण

कोल्हापुरातील राधानगरी इथल्या भोगावती इथं एका एसटी वाहकानंच दुसऱ्या एसटी वाहकला बेदम मारहाण केलीयं..ब्रेक डाऊन एसटीतील प्रवासी घ्या म्हंटल्यावरून ही मारहाण झालीयं..दरम्यान या मारहाणीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलयं.. राधानगरी आगाराच्या अशोक कांबळेंना संभाजीनगर आगाराचे वाहक डी. सी. गुरव यांनी बेदम  मारहाण केलीयं..डी.सी. गुरव यांच्याकडे एका संघटनेचे आगार पातळीवरच्या पदाचा कार्यभार देखील आहे..एका एसटी कर्मचाऱ्यांनेच दुसऱ्या एसटी कर्मचाऱ्याला शुल्लक कारणावरून मारहाण केल्याने कोल्हापूर एसटी आगारात खळबळ उडाली आहे..तर या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल होत असून यावर एसटी महामंडळ काय कारवाई करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Jan 07, 2025 15:30 (IST)

Live Update : मुलाचा विवाहसोहळा काही दिवसांवर असताना शहा दाम्पत्याने उचललं टोकाचं पाऊल

नाशिकच्या टिळकवाडी परिसरातील यशोकृपा बंगल्यात राहणाऱ्या शहा कुटुंबातील जयेश शहा आणि रक्षा शहा या दाम्पत्याने विष सेवन करत आत्महत्या केलीय. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचा विवाहसोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपलेला असतांनाच आई-वडिलांनीच अशाप्रकारे जीवन संपवल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी रात्री मुलासोबत त्यांनी जेवण केले होते आणि सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, शहा दांपत्याचा व्हीसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. 

Jan 07, 2025 15:28 (IST)

Live Update : बीड पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन देखील ॲक्शन मोडवर

बीड पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन देखील ॲक्शन मोडवर

बीड जिल्ह्यातील अवैध धंदे विरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका

राखेची अवैध वाहतुकीसह वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर

बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी महसूल विभागातील पाच जणांना केलं निलंबित 

एक मंडलाधिकारी, दोन तलाठी, शिपाई आणि अन्य एकावर निलंबनाची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात खळबळ

Jan 07, 2025 15:27 (IST)

Live Update : स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक, बोर्डाला फासलं काळ

चर्चगेटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक

स्टारबक्स कॅफेच्या बोर्डाला फासलं काळ 

विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी स्टारबक्स कॅफेला विचारला जाब 

आक्रमक कार्यकर्त्यांना मरीन लाइन्स पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jan 07, 2025 15:25 (IST)

Live Update : भाजप आमदार सुरेश धसच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

भाजप आमदार सुरेश धस यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत या संदर्भात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार असं पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली. युतीधर्म सुरेश धस पाळत नाहीत त्या संदर्भात तक्रार करणार असल्याचे माजी आमदार संजय दौंड यांनी केलं. ते बीडच्या आंबेजोगाई येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते..

Jan 07, 2025 14:47 (IST)

Live Update : दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगानं केली घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखांची केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली आहे.

दिल्लीमधील सर्व 70 विधानसभा मतदारसंघामध्ये 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

Jan 07, 2025 13:25 (IST)

Live Update : कुंभ मेळा आला आणि संपला, असे होत नाही. यातून दीर्घ काळ चालणाऱ्या गोष्टी सुरू होतील - स्वामी विशाल आनंद

कॉमनवेल्थ, वर्ल्डकप आपण आयोजित केले. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहोत. हे शॉर्ट टर्मसाठीचे होते, मात्र त्याचे परिणाम हे लाँग टर्म होते. कुंभ मेळा आला आणि संपला, असे होत नाही. यातून दीर्घ काळ चालणाऱ्या गोष्टी सुरू होतील. संस्कृतीकडे पाहिल्यास आपल्याला देवीदेवता फाटक्यातुटक्या कपड्यांत दिसत नाही, ते छान सजलेले आणि दागिन्यांनी मढलेले दिसतात. ही आपली अर्थव्यवस्था आहे, आपल्या देशाला उगाच सोने की चिड़िया असे म्हटले जात नाही. फक्त 45 दिवसांसाठी 13 हजार विशेष ट्रेन चालवल्या जात आहे, नव्या हवाई सेवा सुरू केल्या गेल्या. रस्त्यांचे जाळे निर्माण केले गेले. ट्रेन, हॉटेल, हॉटेल सेवा आणि अन्य साहित्य पुरवठा याद्वारे रोजगार निर्मिती झालीय. यावर्षी अडीच ते तीन लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, जर तसे झाले तर टॅक्सपोटी उत्तर प्रदेश  सरकारला 25-30 हजार कोटी रुपये मिळतील. जितकी गुंतवणूक झाली त्याची सर्व भरपाई होईल.

- स्वामी विशाल आनंद, प्रमुख आणि कार्यक्रम समन्वयक, दिव्य ज्योती जागृती संस्था

Jan 07, 2025 13:19 (IST)

Live Update : दिल्ली विधानसभा निवडणूकाच्या तारखा आज जाहीर होणार, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

दिल्ली विधानसभा निवडणूकाच्या तारखा जाहीर होणार 

आजपासून आचारसंहिता लागू होणार 

Jan 07, 2025 12:57 (IST)

Live Update : कुंभमुळे प्रयागराजच्या पायाभूत सुविधा सातत्याने सुधारतायेत - असीम अरुण

2019चा कुंभ होता, त्यावेळेस मी तेथे पूर्णवेळ नव्हतो कारण मी तेव्हा सेवेत होतो. तो कुंभ हा अलौकिक होता. कुंभमध्ये ग्लॅम्पिंग शब्द मी शिकलो, ग्लॅमरस कॅम्पिंग असा त्याचा अर्थ होतो. कुंभची सुरुवात समुद्र मंथनातून झाली.  अर्थकारणात म्हणतात की आर्थिक मंथन हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार 6500 हजार कोटी  खर्च करत आहे. सीआयआयच्या 2019च्या अहवालत म्हटले होते की 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल निर्माण झाला होता. यावर्षी हा 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी आशा आहे. कुंभमुळे प्रयागराजच्या पायाभूत सुविधा सातत्याने सुधारत जातेय. पर्यावरणाकडे लक्ष ठेवले जातेय, एक थेंब किंवा एक कणही मैल, कचरा प्रक्रियेशिवाय गंगेत जात नाही. पहिले शौचालयांसाठी खड्डे खणण्यात यायचे, आता असे होत नाही. तिथे अस्थायी नगरात सीवरेज लाइन टाकण्यात आलीय. ट्रीटमेंट प्लाँट बसवण्यात आले आहेत. गंगा ही पवित्र असावी, अशी लोकांची आशा असते, ती तशीच असावी असा आमचा प्रयत्न आहे. तीन हजार कोटी कंपन्यांनी ब्रँडिंग, जाहिरातींवर खर्च केले आहेत. त्यात वाढ होईल असे वाटते. अशी आर्थिक मंथनाची  संधी आम्हाला या महाकुंभमुळे मिळते.

- असीम अरुण, समाज कल्याणमंत्री, उत्तर प्रदेश 

Jan 07, 2025 12:16 (IST)

Live Update : सलमान खानच्या घराला बुलेट प्रुफ काच, सुरक्षा वाढवली

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर सलमान खान याच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून घराच्या बाल्कनीला खास बुलेट प्रुफ काच बसवण्यात आली आहे. 

Jan 07, 2025 12:07 (IST)

Live Update : महाकुंभच्या निमित्ताने नद्यांच्या स्वच्छतेबाबत चर्चा होणे गरजेचे - ऋषी अग्रवाल

कुंभमेळा जेव्हा आयोजित केला जातो तेव्हा नद्यांची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी योग्य संधी असते. नद्यांना आपण पवित्र मानतो आणि नद्यांचे प्रदूषणही आपल्याकडेच होते ही खेदाची बाब आहे. मुंबईतील नद्या अत्यंत प्रदूषित आहे, त्यांना नदी मानण्यास लोक तयार नाही. नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे, कचरा फेकला जातोय. महाकुंभच्या निमित्ताने नद्यांच्या स्वच्छतेबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. महाकुंभमध्ये दिवसाला 1 लाख भाविक येणार आहे. या भाविकांच्या मलमूत्रावर काय प्रक्रिया होणार? यावर कोणतीही माहिती मिळत नाही.

- ऋषी अग्रवाल, पर्यावरणतज्ज्ञ आणि संचालक, मुंबई सस्टेनेबिलिटी सेंटर

Jan 07, 2025 12:06 (IST)

Live Update : महाकुंभ मेळाव्याची अर्थकारणाच्या अंगाने चर्चा

NDTV मराठीच्या महाकुंभ कॉन्क्लेव्हमध्ये महाकुंभ मेळाव्यातील अर्थकारणावर चर्चा करण्यात आली. सकाळी 11.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत याबाबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी  महाकुंभातील अर्थकारणाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. 

बारा वर्षात एकदा येणाऱ्या या कुंभमेळाचा मोठा इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यात सामील होण्याची अनेकांना इच्छा असते. जगभरातील लाखो संख्येने लोक कुंभस्नान आणि संताच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्या प्राचीन परंपरेचा भाग होतात. 

गंगा प्रदूषित होऊ नये यासाठी नाले एसटीपी प्लँटमध्ये सोडण्यात आले असून, तिथून पाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी गंगेमध्ये सोडण्यात येत आहे. 90 टक्के पाणी हे प्रक्रिया करून गंगेत सोडण्यात येत आहे. 15 वर्षापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.

- शोभित कुमार मिश्रा, अदाणी प्रयागराज प्रोजेक्ट

Jan 07, 2025 11:51 (IST)

Live Update : NDTV च्या महाकुंभ कॉन्क्लेव्हला सुरुवात...

Jan 07, 2025 11:42 (IST)

Live Update : उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी कंटनेरसह 17 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त....

उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी कंटनेरसह 17 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त....

उत्तर प्रदेशातून मुंबईमधील भिवंडी येथे एका कंटेनरमधून होणारी गुटख्याची तस्करी रोखण्यात सोनगीर पोलिसांना यश आले. या कारवाईत 15 लाख रूपये किंमतीच्या कंटेनरसह 2 लाख 88 हजार 750 रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा मिळून एकूण 17 लाख 88 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jan 07, 2025 11:38 (IST)

Live Update : मी राजीनामा दिलेला नाही - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल झाले आहेत. मात्र राजीनामा दिला नसल्याचं केलं जाहीर

Jan 07, 2025 11:28 (IST)

Live Update : उड्डाणपूल नसल्याने नांदेड अकोला राष्ट्रीय महामार्ग बनला धोकादायक..

नांदेड अकोला राष्ट्रीय महामार्गावरील बासंबा फाटा येथे पुसद कडून येणारा महामार्ग येऊन मिळतो. त्याचबरोबर अकोला वाशिमकडून वेगात नांदेडकडे जाणारी वाहनं, हिंगोली शहरात येणारी जाणारी वाहनं अशी या चौकामध्ये मोठी वर्दळ असते. परंतु या चौकामध्ये उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. अपघातांचं सत्र सुरू असल्याने नागरिकांनी अनेकदा उड्डाणपूलासाठी आंदोलन केली, परंतु उड्डाणपूल मात्र झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील घोषणा केली परंतु उड्डाणपुलाची मंजुरी होऊनही अद्याप इथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झालं नसल्याने उडाणपूल करण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे. 

Jan 07, 2025 10:52 (IST)

Live Update : धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांची मुंबई हायकोर्टात धाव

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांची मुंबई हायकोर्टात धाव

Jan 07, 2025 10:19 (IST)

Live Update : मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा खून

अकोल्यात सकाळी हत्येचा थरार. मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा खून. अकोल्यातील गीता नगर भागातल्या जुना हिंगणा परिसरातील घटना. जुना हिंगणा भागातील सविता ताथोड या महिलेचा धारदार शस्त्राने निर्घृण खून. धीरज चुंगडे असं आरोपीचं नाव. जुन्या वादातून महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी जुने शहर पोलीस दाखल. घटनेनंतर आरोपी फरार. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. सकाळी झालेल्या खुनाच्या घटनेने अकोला हादरला.

Jan 07, 2025 10:15 (IST)

Live Update : आशिष शेलार राजधानी दिल्लीमध्ये दाखल

आशिष शेलार राजधानी दिल्लीमध्ये दाखल

मंत्री झाल्यानंतर आशिष शेलार पहिल्यांदाच दिल्लीत दाखल

आज राजधानी दिल्लीत घेणार भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट

Jan 07, 2025 09:47 (IST)

Live Update : तारापूर औद्योगिक वसाहतीतील नामांकित स्टील कंपनीवर आयकर विभागाचे छापे

बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील स्टील निर्मितीत नामांकित असलेल्या विराज प्रोफाइल कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आज पहाटे पाच वाजेपासून आयकर विभागाची टीम विराज प्रोफाइल जी टू या प्लॉट नंबर वर दाखल झाली असून कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. कंपनीच्या गेट समोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .  मात्र आयकर विभागाच्या किती तुकड्या दाखल झाल्या आहेत याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Jan 07, 2025 08:25 (IST)

Live Update : बीडमध्ये घडामोडींना वेग, सरपंच संतोष देशमुख कुटुंब मुंबईकडे रवाना

बीडमध्ये घडामोडींना वेग, सरपंच संतोष देशमुख कुटुंब मुंबईकडे रवाना 

रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

हत्या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा अशी मागणी करण्याची शक्यता

Jan 07, 2025 08:11 (IST)

Live Update : मनोज जरांगेंवर 24 तासात 9 गुन्हे दाखल

मनोज जरांगेंवर 24 तासात 9 गुन्हे दाखल

धनंजय मुंडेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हे दाखल

परळी, शिवाजीनगर, केज, आंबेजोगाई, शिरसाळा, शिरूर, धारूर, परळी ग्रामीण, गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल 

मनोज जरांगे यांनी परभणीच्या सभेतून मुंडेंवर केली होती टीका

जरांगेंच्या टीकेवरून मुंडे समर्थक आक्रमक

Jan 07, 2025 07:53 (IST)

Live Update : नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात टास्क फोर्सचं गठन

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं असल्याची माहिती नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दिली आहे.  मुख्य टास्क फोर्स जिल्हा टास्क फोर्स राहणार असून जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असतील.

याशिवाय नायलॉन मांजा नागपूर महानगपालिका सर्व झोन, जिल्हा परिषद, तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महा मेट्रो, वन विभाग आणि प्राणी संवर्धन विभाग अशा सर्व स्तरावर टास्क फोर्स चे गठन करण्यात आले असल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

Jan 07, 2025 07:52 (IST)

Live Update : बीडमध्ये गुन्हे असलेल्या 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द

बीडमध्ये गुन्हे असलेल्या 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द

पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन देखील अॅक्शन मोडवर 

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांना नोटीशी बजावल्या होत्या.

नोटीस बजावलेल्या सर्व 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द

अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या कैलास फडचा देखील पिस्तूल परवाना रद्द

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 1281 शस्त्र परवाने दिलेले आहेत. 

परवाने देण्यात आलेल्यांपैंकी 232 जणांवर 1 ते 16 गुन्हे आहेत

Jan 07, 2025 07:15 (IST)

Live Update : सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरात गोळीबार, गोळीबारात एक जण जखमी

सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरात गोळीबार

गोळीबारात एक जण जखमी

चार राऊंड फायर, पोलिसांकडून तपास सुरू

Jan 07, 2025 07:14 (IST)

Live Update : HMPV रुग्णांचा आकडा वाढला, रुग्णसंख्या पोहोचली पाचवर

HMPV रुग्णांचा आकडा वाढला, तामिळनाडूमध्ये आणखी दोन रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या पाचपर्यंत पोहोचली आहे.