संतोष देशमुख यांची छळ करुन हत्या केल्याचे फोटो आणि काही व्हिडीओ समोर आले आहेत. यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनोज जरांगे यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा नुसता राजीनामा नको, तर कलम 302 लावला पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. या सगळ्याला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांना पैसे गोड लागले. आतापर्यंत त्यांचे लोक कुणाचाही खून करायचे. पैसे मिळायचे म्हणून त्यांना मोकळं सोडलं होते. धनंजय मुंडेंचे ही लोक आहे. खंडणी मागितली, खून केल्याची त्यांना माहिती होती. धनंजय मुंडेंवर कलम 302 नुसार कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
धनंजय मुंडेंना बडतर्फ करा - अंजली दमानिया
एवढं सगळं पाहून सुद्धा राजीनामा द्या असं सांगितलं जातं आहे. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का करू शकत नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. असे मंत्री नको हे आदेश द्यायला दोन मिनिटं नाही लागली पाहिजेत. आज जर राजीनामा नाही आला तर संपूर्ण महाराष्ट्र विधानभवनावर असेल. बदरतर्फीचे आदेश नाही आले तर अधिवेशन बंद पडणार, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
"धनंजय मुंडे राजीनामा द्या"
संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत संतापजनक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर वरदहस्त असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. तर धनंजय मुंडे राजीनामा देण्यात तयार नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे दिल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.