Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात होत आहे. या हत्या प्रकरणात आता खळबळजनक खुलासे होत असून एसआयटीने वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक दावे केले असून त्याचा देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. एसआयटीने कोर्टासमोर 10 मोठे मुद्दे मांडत वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एसआयटीने मांडलेले 10 मुद्दे?
1. संतोष देशमुख यांची कट रचून हत्या करण्यात आली.
2. या गुन्ह्यातील आरोपी सराईत आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याबाबतही तपास करायचा आहे.
3. आरोपी कृष्णा आंधले अजूनही फरार आहे. त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का? हे तपासायचे आहे.
4. तीन आरोपींमध्ये 10 मिनिटे संभाषण झालं. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली? हे पाहायचे आहे.
5. वाल्मिक कराडची विदेशामध्ये मालमत्ता आहे का? याबाबत चौकशी सुरु आहे.
6. संतोष देशमुख हत्येमधील आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये कनेक्शन आहे का? याची माहिती घ्यायची आहे.
7. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, त्याला लपवले का? याबाबत तपास करायचा आहे.
8. आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली?
9. वाल्मिक कराडविरोधात ठोस पुरावे हाती लागले आहेत.
10. आरोपींचे संभाषण आणि हत्येची वेळ मिळती-जुळती आहे, त्याचा तपास करायचा आहे.
दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाल्मीक कराड यांचं नाव कोणत्याही आरोपीने घेतलेलं नाही. वाल्मीक कराड याचं खुनाचा गुन्हा बेकायदेशीर आहे. वाल्मिक कराडविरोधात कोणताही पुरावा नसून कराडची अटकही बेकायदेशीर आहे, असा दावा वकिलांनी केला. त्यामुळे कोर्टात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.