जाहिरात

Rahul Gandhi on Mohan Bhagwat: भारताविरोधात लढा? राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे भाजप नेते भडकले

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे ( News Congress HeadQuerter) 15 जानेवारी रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Mohan Bhagwat)

Rahul Gandhi on Mohan Bhagwat: भारताविरोधात लढा? राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे भाजप नेते भडकले
नवी दिल्ली:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. भारताला खरे स्वातंत्र्य 1947 साली नाही तर अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर मिळाले अशा आशयाचे विधान भागवत यांनी केले होते. यावरून राहुल गांधी यांनी कडाडून टीका केली. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे 15 जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, मोहन भागवत यांचे हे विधान म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. त्यांचे हे विधान स्वातंत्र्य सैनिकांसह प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मोहन भागवत दर 2-3 दिवसांनी आपल्या भाषणातून त्यांचे भारताचा स्वातंत्र्य लढा, संविधानाबद्दलचे त्यांचे विचार काय आहेत हे सांगत असतात. नुकतेच त्यांनी जे विधान केले ते देशद्रोही विधान आहे. कारण त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की, संविधानाचे काहीही औचित्य नाही, इंग्रजांना देशातून हाकलून देण्यासाठीच्या स्वातंत्र्य लढ्याचे काहीही महत्त्व नाही. सरसंघचालकांनी म्हटले होते की, अयोध्येत प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला गेला पाहिजे. कारण याच दिवशी अनेक आक्रमकांनी केलेली आक्रमणे झेलल्यानंतर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, भारतात सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीची विधाने केली जात आहे. इतर देशात जर कोणी असे म्हटले असते तर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असती आणि त्या व्यक्तीविरोधात खटला चालवण्यात आला असतो. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे प्रत्येक भारतीयाचा अपमान असल्याचेही राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. ही बकवास बंद ऐकणं बंद करण्याची गरज आहे, कारण ही मंडळी पुन्हा-पुन्हा तीच गोष्ट ओरडून ओरडून सांगत राहतील.   काँग्रेस वगळता या देशात एकही पक्ष असा नाहीये जो संघाचा अजेंडा रोखू शकेल. काँग्रेस हा एका विचारधारेवर चालणार पक्ष आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले.   

नक्की वाचा : 15 जानेवारी देशासाठी अत्यंत महत्त्वाचा का ? पीएम नरेंद्र मोदींनी स्वत: सांगितले

संघ आणि भाजपसोबत 'इंडियन स्टेट' विरोधात लढाई!

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, आपली लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच नाही तर इंडियन स्टेटसोबतही (भारतासोबत) आहे. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणाच्या अज्ञानाला काय उत्तर देणार असा प्रश्न विचारला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की भारत जोडोच्या नावाखाली ही मंडळी भारत तोडायला निघाली आहेत. मोदी यांचा विरोध करता करता ही लोकं आता भारताविरोधात उतरली आहेत. हा योगायोग नसून हा एका कटाचा भाग असल्याचाही आरोप पूनावाला यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की सोरोस यांच्या अर्थपुरवठ्यामुळे ही लोकं भारत देश आणि इथल्या लोकांच्याविरोधात लढायला उतरली आहेत.   

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आपण निष्पक्ष स्थितीत लढा देतोय असे समजू नका. तुम्हाला असे वाटत असेल की आपण फक्त भाजप नावाच्या राजकीय पक्षाशी आणि RSS विरोधात लढतोय तर असे नाहीये. कारण त्यांनी देशातील प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com