नवरात्रौत्सवापूर्वी सप्तश्रृंगी गडावर जाताय? घाट वाहतुकीचा रस्ता 4 दिवस बंद, जाणून घ्या कधी होणार सुरू

नवरात्रौत्सवाच्या आधी सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

नवरात्रौत्सवाच्या आधी सप्तश्रृंगी गडावर (Saptsringi Fort) जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर आगामी आठवड्यात सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लान करीत (Vani) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

उद्यापासून पुढील चार दिवस सप्तश्रृंगी गडावर जाणारा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घाट वाहतुकीचा रस्ता बंद राहणार आहे. उद्या 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत येथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. घाटात वारंवार सुरू असलेल्या दरड कोसळल्याच्या घटनेनंतर दरड प्रतिबंधक जाळी बसविण्यासाठी तब्बल चार दिवस सकाळच्या वेळेत येथील वाहतूक बंद राहील. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांची माहिती दिली आहे. 

नक्की वाचा - Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 तारखेपासून घटस्थापना होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर 3 ते ऑक्टोबर 12 या नवरात्रौत्सवाच्या कालावधीत देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे नवरात्र आणि कोजागिरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील कामकाज युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. घाटातील सैल दगडही काढले जाणार आहे. यापूर्वी या भागातील अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन  तीर्थक्षेत्र विकास निधीतून काम सुरू करण्यात आले आहे.