सुनील कांबळे, लातूर
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अशात लातूरमध्ये एका सरपंचाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी गावातील सरपंच आणि गावातीलच तरुणांमध्ये किरकोळ वाद होऊन सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
ग्रामपंचायतीने घरासमोर महावितरणाचे पोल उभे केले. तसेच उभे करण्यात आलेल्या पोलमध्ये करंट उतरला आहे, अशी तरुणांचा तक्रार होती. यावरुन किरकोळ वाद झाला होता.
(नक्की वाचा- परळीत काम नको रे बाबा! औष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी करुन घेतल्या बदल्या; 150 जणांची उचलबांगडी)
मात्र सरपंच यांनी तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरपंचांनी सुरुवातीला सांगितलं की हा महावितरण विभागाचा प्रश्न आहे मी महावितरणच्या लाईनमनला फोन करून या सर्व घटनेची माहिती देतो असं सांगितले.
मात्र संपातलेल्या तरुणांनी मात्र सरपंचाला अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्येच जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. सरपंच रुबाब चांदसाब शेख असं या सरपंचाचे नाव आहे. गावातीलच वाजीद पठाण, बाशीर पठाण, महबूब पठाण यांनी सरपंचाला जबर मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या मारहाणीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक साहित्याची तोडफोड होऊन मोठं नुकसान झाला आहे.
(नक्की वाचा- लव्ह, सेक्स आणि पॉवरची जीवघेणी गोळी! तरुणासोबत भयंकर घडलं; गर्लफ्रेंडच्या डोळ्यादेखत तडफडला अन्....)
पोलीस तक्रार घेत नसल्याचा सरपंचाचा आरोप
गावातील तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यासाठी सरपंच पोलिसात गेले होते. मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत तक्रार घेतली नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांवर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा, अशीच मागणी या सरपंचांनी यावेळी व्यक्त केली.