आकाश सावंत
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. या डॉक्टर तरुणीची हत्या की आत्महत्या अशी चर्चा होत आहे. शिवाय हे प्रकरण चांगलच तापलं आहे. एकीकडे ही हत्या असल्याचे आरोप केले जात आहेत. राजकीय आरोप होत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशातच आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा - Satara Doctor Case: 'ही हत्याच!, एका 'री' ने केसला कलाटणी? सॉलिड थिअरी आली समोर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेबूब शेख यांना फोन कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवाय शिवीगाळ
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात आवाज का उठवतोस अशी विचारणा करण्यात आली. या प्रकरणात जास्त बोललास तर वाईट परिणाम होतील अशी धमकी ही देण्यात आल्याचा दावा महेबूब शेख यांनी केला आहे. साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. त्यानंतर यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे.
याच प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्या प्रकरणातील संदर्भात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक लोकांना डांबून ठेवून मारलं आहे. याबाबत मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना फोनद्वारे व्हाट्सअप कॉलवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अश्लील शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यामुळे शेख यांना धमकावणारे हे लोक कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे हा प्रश्न सर्वां समोरच पडला आहे.