जाहिरात

Satara Doctor Suicide Case: हॉटेल, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार, बदनेकडे महत्त्वाचा पुरावा आहे?

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

Satara Doctor Suicide Case: हॉटेल, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार, बदनेकडे महत्त्वाचा पुरावा आहे?
"Satara Doctor Suicide Case: गोपाल बदनेच्या मोबाइलमध्ये काय आहे?"
NDTV Marathi

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दरदिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेच्या आत्मसमर्पणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. गोपाल बदनेनं सर्व पुरावे नष्ट केले आणि त्यानंतर आत्मसमर्पण केले, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. 

गोपाल बदनेचा फोन महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो? 

यादरम्यान मंगळवारी (28 ऑक्टोबर 2025) एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या गोपाल बदनेचा फोन अद्याप सापडलेला नाही. 25 ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर गोपाल बदनेकडे त्याच्या मोबाइल फोनबाबत चौकशी केली जात आहे, जो एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो; असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

बदनेनं फोन कुठे आणि का लपवलाय?

बदनेनं त्याचा मोबाइल फोन कुठेतरी लपवला आहे आणि याबाबत त्याची चौकशी केली जातेय, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. 

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे मोठा खुलासा समोर

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे मोठा खुलासा समोर)

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण | Satara Woman Doctor Suicide Case In Marathi 

साताऱ्यातील सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. 23 ऑक्टोबर रोजी एका हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. महिला डॉक्टरने त्यांच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती, ज्यामध्ये गोपाल बदनेवर बलात्कार आणि प्रशांत बनकरविरोधात मानसिक छळाचा आरोप त्यांनी केला आहे.

(नक्की वाचा: Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे)

मागील आठवड्यातच पोलिसांनी बदने आणि बनकरविरोधात बलात्कार तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघांविरोधात अटकेचीही कारवाई करण्यात आलीय. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com