Satara News: सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणखी एक वाघ, ‘हिरकणी’च्या एन्ट्रीचा दमदार Video

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेला, सुमारे 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

राहुल तपासे 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघीणीची यशस्वी निसर्गमुक्तता करण्यात आली आहे. कोयना वन्यजीव अभयारण्यात ‘हिरकणी'ची दमदार एन्ट्री झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली वाघीण STR 06 हिला शनिवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्याच्या कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे. निसर्गाच्या सानिध्यात जाताना वाघाने फोडलेली डरकाळी सर्वांनाच आकर्षीत वाटली आहे. 

गुरुवारी संध्याकाळी पेंचमधील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून या वाघीणीला पकडण्यात आले होते. त्यानंतर विशेष सुरक्षेत पणे तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री तिला कोयना अभयारण्यात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर वाघीणीने पाणी आणि मटण खाल्ल्याने तिची प्रकृती स्थिर असल्याची खात्री झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी तिला निसर्गात मुक्त करण्यात आले.

Advertisement

नक्की वाचा - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरें निवडणुकीच्या मैदानात? विधान परिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार

कोयना अभयारण्यात आधीपासून असलेल्या नर वाघ STR 03 – बाजी याच्या जोडीला आता ही वाघीण दाखल झाली आहे. यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ संवर्धनाला मोठे बळ मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यात वन्यजीव पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या व्याघ्र पर्यटनासाठी विदर्भात जावे लागते. मोठ्या प्रमाणात पर्यटक वाघ पहाण्यासाठी तिथे जातात. पण या नव्या उपक्रमामुळे सह्याद्रीच्या जंगलातही आता व्याघ्र पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. 

नक्की वाचा - Shocking news: खड्ड्याने 6 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला!, खेळता खेळता घात झाला, जबाबदार कोण?

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेला, सुमारे 1165 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जैवविविधतेने समृद्ध असा प्रकल्प आहे. सह्याद्रीच्या जंगलात ‘हिरकणी'च्या आगमनाने वाघांच्या अस्तित्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात याचा मोठा फायदा होईल असा विश्वास सर्वांनाच आहे.