'लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले अन् तिकडे उधारी फिटली'

लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातल्या कोट्यवधी महिला घेत आहेत. त्यांना या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून मोठा आधार मिळत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
सातारा:

सुजित आंबेकर 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ राज्यातल्या कोट्यवधी महिला घेत आहेत. त्यांना या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून मोठा आधार मिळत आहेत. अशीच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. योगिता जंगम या साताऱ्या जवळ असलेल्या पिल्लेश्वरीनगर या गावात जिल्हा परीषद कॉलनी मध्ये राहतात. त्यांनाही या योजनेचा लाभ घेतला आहे. पण योजनेमुळे त्यांच्यावर असलेली उधारी फेडण्यात त्यांना मदत झाली आहे. त्यांचा उधारी फेडण्याचा हा आनंद शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे दिड हजाराचं मोल काय असतं हे या उदाहरणावरून दिसून येते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

योगिता जंगम या  गेले दहा वर्षे मेस चालवतात. कॉलेज मधील युवक युवती नोकरदार हे योगिता ताई यांच्या कडून रोज डबे घेवून जातात. दोन खोलीच्या घरात राहणारे हे सामान्य असे जंगम कुटुंब आहे. योगिता यांचे पती हे खाजगी गाडीवर ड्राइव्हवरची नोकरी करतात. कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालावा म्हणून योगिता यांनी मेस सुरू केली. गेली दहा वर्षे त्या मेस चालवता. मेस चालवताना अनेक वेळा त्यांना उधारी उसनवारी करावी लागते. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेचे पैसे अनपेक्षित पणे मिळाले. खात्यात दोन महिन्याचे एकदम तीन हजार जमा झाले. त्यामुळे त्यांची उधारी फिटली आहे. अचानक मिळालेल्या या पैश्यामुळे योगिता यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले

योगिता जंगम या रोज मेससाठी जवळ असलेल्या दुकानातून किरणामाल तसेच भाजी खरेदी करतात. अनेक वेळा मेस मेंबर हे वेळेत पैसे देत नाहीत. त्यामुळे उधारी करावी लागते. अश्या वेळेस हे पैसै त्यांना नक्कीच उपयोगी पडतात. योगिता जंगम यांना दोन मुले आहेत. छोटी मुलगी मनस्वी ही योगिता यांना कामात हातभार लावते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणीचे पैसै मिळाल्याचा आनंद मनस्वीने ही बोलून दाखवला. आम्हाला सरकारने दिलेली ही मदत आमच्या कुटुंबासाठी खूप मोलाची आहे.  आईला मिळालेल्या पैशांचा उपयोग भविष्यात आई माझ्या शिक्षणासाठी तसेच भावाच्या कॉलेजसाठी उपयोगी ठरणार आहे असंही ती यावेळी म्हणाली. हे पैसै आमच्या कुटुंबाला खूप मोठी मदत करणारे ठरले आहेत असंही तीनं सांगितलं.  

Advertisement

Advertisement