जाहिरात
This Article is From Sep 07, 2024

Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव अगोदर घेतल्यामुळे संदीपान भुमरे चांगलेच संतापले. भुमरे यांना आयोजकांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. यावेळी चंद्रकांत खैरे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.

Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले

छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान राजकीय मंडळींमध्ये मान-अपमानाचं राजकारण पाहायला मिळलं. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीच्या कार्यक्रमात खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात स्टेजवरच जुंपली. 

छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरतीसाठी सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, चंद्रकांत खैरे इत्यादी नेते संस्थान गणपतीच्या कार्यक्रमात उपस्थित होते.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव अगोदर घेतल्यामुळे संदीपान भुमरे चांगलेच संतापले. भुमरे यांनी संताप व्यक्त करत आयोजकांना प्रोटोकॉल पाळा. देवाच्या ठिकाणी पक्षपात करु नका, असा सल्ला दिला. स्टेजवर मंत्री, माजी मंत्री उपस्थित असताना त्यानुसार सन्मान करावा, अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांत खैरे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.

हे ही वाचा : महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई

संस्थान गणपतीचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नव्हता. त्यामुळे इथे प्रोटोकॉलचा संबंध येत नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. तर चंद्रकांत खैरै यांना आपण माजी झालोय हेच मान्य नाही, असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला. मात्र धार्मिक कार्यक्रमात झालेल्या या राजकीय खडाजंगीमुळे सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. 

खैरे चिडचिड करतात- भुमरे

कार्यक्रम संपल्यानंतर संदीपान भुमरे यांनी म्हटलं की, स्टेजवर राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड उपस्थित होते. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. मी माझ्यासाठी बोलत नव्हतो. चंद्रकांत खैरे यांना चिडायची गरज नव्हती. मात्र सध्या नुसती चिडचिड करतात. प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करु. मात्र देवाच्या ठिकाणी असं झालं नाही पाहिजे. 

(नक्की वाचा -  Sindhudurg Accident : गणेशभक्तांच्या बसला अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक)

धार्मिक कार्यक्रमात कसला प्रोटोकॉल- खैरे

चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, माझं स्वागत आधी झालं म्हणून त्यांना राग आला. गणपतीमध्ये प्रोटोकॉल नसतो, सरकारी काम असतं तर प्रोटोकॉल असतो. देवाच्या दरबारात सगळे सारखे असतात. त्यांचं वागणं बरोबर नाही, त्यांनी चुकीचं केलं. मी भक्त आहे म्हणून शांत बसलो. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Chhtarapati Sambhajinagar, Sandipan Bhumre, Chandrakant Khaire, छत्रपती संभाजीनगर