सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठा विरोध पत्करून शाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे मुलींनी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले होते. 01 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पाहिली शाळा सुरु केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या कार्यकाळात 18 मुलींच्या शाळा सुरु केल्या. मात्र नंतरच्या कळात या शाळा बंद पडल्या. असं असलं तरी फुले यांनी सुरु केलेली ओतूर येथील मुलींची चौथी शाळा आजही 175 वर्षा नंतर आजही सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलींची शाळा सुरु करण्यापूर्वी महात्मा फुले यांनी प्रथम सावित्रीबाई फुले यांना शिकवून साक्षर केलं. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर फुले यांनी पुणे इथे भिडे वाड्यात मुलींची पाहिली शाळा सुरु केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे मुलींची चौथी शाळा सुरु केली. त्यातून ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले होते. त्या काळात त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Mumbra Contro: मुंब्र्यात मराठीचा आग्रह, जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर...
फुलेंनी आपल्या हयातीमध्ये एकूण अठरा शाळा सुरु केल्या. आज 177 वर्षानंतर त्यातली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूरची एकमेव शाळा सुरु आहे. फुलेंनी सुरु केलेली मुलींची ही चौथी शाळा होती. फुलेंचे सत्यशोधक समाजातील सहकारी भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली आहे. आज ही या शाळेत मुलींचे चौथी पर्यंतचे वर्ग भरतात. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ही शाळा चालवली जात आहे.
सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. या शाळेचे बांधकामही भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनीच केलं. दळणवळणाची साधन उपलब्ध नसताना त्या काळी पुण्याहून ओतूरला येऊन मुलींची शाळा सुरू करण्याचे काम म्हणजे पुरोहितशाहीच्या वर्चस्वाला झुगारून मोठा संघर्षच होता. हा संर्घष ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासोबतच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही केला. त्यामुळे इथल्या मुलींना आता शिक्षण घेणं सहज आणि सोपं झालं आहे.
आज ओतूरची ही शाळा सुरु असली तरी तिची अवस्था म्हणावी इतकी चांगली नाही. ही शाळा म्हणजे केवळ दगडी वर्ग खोल्या नाहीत, तर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळं हा वारसा नेटाने जपवायला हवाय.तो दिमाखात उभारायला हवा अशी मागणी होत आहे. ही शाळा म्हणजे इतिहासाचे एक पान आहे. इतिहासाचा हा एक वारसा आहे. याची जाणीव प्रत्येकालाच असली पाहीजे. ही शाळेची सरकारनेही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे.