आज रमजान ईदीसाठी देशभरात मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी ईदगाह परिसरात मुख्य नमाजनंतर पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही तरुणांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्टर आणले होते. हे तरुण SDPI चे (Social Democratic Party of India) कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे.
बंदी असलेल्या या एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर हातात घेऊन फ्री पॅलेस्टाईनची घोषणाबाजी करण्यात आली. मुख नमाज नंतर छावणी परिसरातील ईदगाह परिसरातील ही घटना घडली. पोलिसांकडून पोस्टर हिसकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मुस्लिमांनी समर्थन केल्यानं पोलिसांना पोस्टर घेता आलं नाही, असं सांगितलं जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.