Beed Police: आई ढसाढसा रडली, वडील पोलिसांच्या पाया पडले; बीड पोलिसांची हळवी बाजू आली समोर

Beed Police: बीड पोलिसांची ही कामगिरी केवळ एका मुलाला शोधून काढण्याची नाही, तर एक कुटुंब जोडण्याची आहे. याच भावनिक क्षणाचा एक व्हिडीओ अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Beed News : पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते एक कठोर, कायद्याचे पालन करणारी आणि कणखर प्रतिमा. मात्र पोलिसांच्या वर्दीच्या आतही एक संवेदनशील आणि माणुसकीने भरलेले मनही असते, याची प्रचिती बीडमध्ये आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यात बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची संवेदनशील बाजू समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

बीडमधील एक मुलगा घर सोडून निघून गेला होता. मात्र मुलगा डोळ्याआड गेल्याने आईच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. ती माऊली चिंतेत होती. अशा परिस्थितीत, आईची व्यथा समजून घेत, PSI पल्लवी जाधव यांनी त्या मुलाचा शोध घेण्यासाठी दिवस-रात्र एक केली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मुलाचा शोध घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी त्या मुलाला सुखरूप शोधून काढले. मुलाला समोर पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.

(नक्की वाचा: कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले! )

मात्र बीड पोलिसांची ही कामगिरी केवळ एका मुलाला शोधून काढण्याची नाही, तर एक कुटुंब जोडण्याची आहे. याच भावनिक क्षणाचा एक व्हिडीओ अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे त्या कुटुंबातील सदस्यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख असलेल्या कावत यांची हळवी बाजू समोर आली आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "ह्याला म्हणतात संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष पोलीस. माझ्या बीड जिल्ह्यातील PSI पल्लवी जाधव यांना मनापासून सलाम. एक मुलगा जो घर सोडून निघून गेला होता, त्याचा शोध घेऊन आई आणि मुलाला सुखरूप एकत्र करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. Well done PSI पल्लवी! ह्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्वतः SP नवनीत कावत उठून त्या परिवाराची गळाभेट घेताना दिसत आहेत. ह्याला म्हणतात खरे पोलीस. आपल्या बीडला पल्लवी आणि कावत सरांसारख्या अधिकाऱ्यांचीच गरज आहे."

Advertisement

(नक्की वाचा: पुणे मेट्रो स्थानकात तोबा गर्दी, मुंबईतील लोकल स्थानकासारखी धक्काबुक्की )

या घटनेतून बीड पोलीस केवळ गुन्हेगारांना पकडण्यातच नाही, तर कौटुंबिक समस्या सोडवण्यातही किती संवेदनशील आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बीड पोलिसांच्या या कृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उजळून निघाली आहे.

Topics mentioned in this article