Sharad Pawar admitted to hospital : शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. शरद पवारांच्या अनेक चाचण्या करावयाच्या आहे. यासाठी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात हलविण्यात आलं होतं. आज पुन्हा शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवारांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी राज्यभरातून प्रार्थना केली जात आहे. शरद पवार ८५ वर्षांचे आहेत. ते राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. शरद पवारांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.