राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. शरद पवारांना सोडून एक मोठा गट अजित पवारां बरोबर गेला. त्यात धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. मुंडे मंत्री झाले. सध्या त्यांच्यावर कृषी मंत्री म्हणून जबाबदारी आहे. हे धनंजय मुंडे आता शरद पवारांच्या रडारवर आल्याचे बोलले जात आहेत. मुंडेंच्या परळी विधानसभा मतदार संघात पवारांनी आता फासे टाकले आहेत. त्यासाठी एका नवा दमाच्या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मराठा आंदोलनचा असलेला असर पाहात इथं जो उमेदवार पवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे इथली लढत ही चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परळी विधानसभा मतदार संघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणाला उतरवायचे याची चाचपणी शरद पवार करत आहेत. परळीच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष स्वर्गिय एन. के. देशमुख यांची छाप होती. यांचे पुतणे अभिजीत देशमुख हे सध्या राजकारणात सक्रीय आहेत. ही बाब हेरून पवारांनी देशमुख यांनाच परळीतून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले
परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार का अशी थेट विचारणा शरद पवारांनी केली. असा दावा अभिजित देशमुख यांनी केला आहे. परळी मतदार संघातून निवडणूक लढविण्या बाबत विचारणा केली आहे. त्यानंतर पुण्यामध्ये पक्षाची मुलाखतही दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रोहित पवार यांच्याशीही माझी चर्चा झाल्याचे अभिजीत देशमुख म्हणाले. शरद पवारांशी जवळीक असलेले तर एकेकाळी अजित पवारांचे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. विलासराव देशमुख यांचे ही ते नातेवाईक आहेत.
ट्रेंडिंग बातमी - राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा
परळी विधानसभा मतदार संघातून 2019 साली धनंजय मुंडे यांनी मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव करत जोरदार धक्का दिला होता. परळी हा गोपिनाथ मुंडेंचा गड समजला जात होता. पंकजा मुंडे यांनी हा गड गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही राखला होता. पण त्याला तडा धनंजय मुंडे यांनी दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात धनंजय मुंडे हे मंत्री झाले. अजित पवारांनी बंड केले. त्याला धनंजय मुंडे यांनी साथ दिले. परत ते मंत्री झाले. त्यांच्यावर कृषीमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत शरद पवार आहेत.