सुनील दवंगे, शिर्डी
Shirdi Crime News : शिर्डीतील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स घोटाळ्याचा पसारा वाढत चालला आहे. ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स विरोधात शिर्डी, राहाता नंदुरबार येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक परताव्याचं अमिष दाखवत गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मास्टरमाईंट भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील याच्यासह त्याचे वडील आणि इतरावंर शिर्डी आणि राहाता पोलीसात भारतीय न्याय संहिता 318(4) ,316(2), 3(5) आणि महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम (1999) च्या 3 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पावने दोन कोटींची फसवणूक झालेले 22 गुंतवणूकदार आले समोर आले आहेत. शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार येथील दाखल गुन्हात मास्टरमाईंट भूपेंद्र पाटील पोलिसांच्या अटकेत आहे. महाराष्ट्र नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार अशा अनेक ठिकाणी अधिक परतावा देण्याचं आमिष देत नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याची खात्रिलायक माहिती आहे.
Vidarbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
गुन्हे दाखल असलेले आरोपी
ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स घोटाळ्यात आतापर्यंत भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर, राजाराम भटू सावळे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदिप सावळे, सुबोध सावळे, अरुण रामदास नंदन, पूजा गोकुळ पोटींडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणुकीचा फॉर्म्युला
आरोपींनी सुरुवातीला काही महिन्यांचे हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण केला. मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन दिले. त्यानंतर अचानक शिर्डीतील कार्यालय बंद, फोन बंद आणि आरोपी कुटुंबासह फरार झाले. महागड्या गाड्या आणि हायफाय राहणीमान, अधिकचा खर्च करत गुंतवणूकदारांना भूरळ पाडल्याचा फंडा या घोटाळ्यात वापरण्यात आला.