Shirdi News: वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईचरणी 80 लाखांचा मुकुट अर्पण; कोण आहे दानशूर साईभक्त?

Shirdi News: मुकुटामध्ये अंदाजे 585 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मुकुटाची शोभा वाढवण्यासाठी त्यात सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे जडवण्यात आले आहेत. मुकुटाचे एकूण वजन 655 ग्रॅम इतके आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी

Shirdi News: जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दानाचा वर्षाव झाला आहे. साईबाबांच्या चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका दानशूर भाविकाने सुमारे 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.

या दानामुळे शिर्डीत नववर्षाचा उत्साह द्विगुणित झाला असून, या आकर्षक मुकुटाची सध्या भाविकांमध्ये मोठी चर्चा आहे. हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील एका साईभक्ताने बाबांना अत्यंत देखणा आणि मौल्यवान असा सुवर्ण-हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

कसा आहे मुकुट?

या मुकुटाची एकूण किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. यामध्ये अंदाजे 585 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मुकुटाची शोभा वाढवण्यासाठी त्यात सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे जडवण्यात आले आहेत. मुकुटाचे एकूण वजन 655 ग्रॅम इतके आहे.

कोण आहे साईभक्त?

हरियाणातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती आणि प्रतिमा मोहंती यांनी हा मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केला. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे हा मुकुट सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थानच्या वतीने मोहंती दांपत्याचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.

Advertisement

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajingar: "जादूटोण्यामुळेच माझा पराभव झाला!" फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराचा खळबळजनक आरोप)

नववर्षाचा उत्साह

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी असते. नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी लाखो लोक शिर्डीत येतात. अशा शुभ मुहूर्तावर मिळालेल्या या मोठ्या दानामुळे साई संस्थानच्या तिजोरीत मोलाची भर पडली आहे. बाबांवरील भक्तीपोटी भाविक अशा प्रकारे सोने, चांदी आणि रोख रकमेच्या स्वरूपात दान अर्पण करत असतात.

Topics mentioned in this article