Shiv Jayanti 2025: ...म्हणून छत्रपतींचं 'शिवाजी' नाव ठेवले! काय होता माँसाहेब जिजाऊंचा नवस?

Chhatrapati Shivaji Maharaj Special Story: पुण्यवंत, सामर्थ्यवंत, नितीवंत जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त जगभरात आज मोठा उत्साह साजरा केला जात आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज संस्थापक, आईने पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी सह्याद्रीमध्ये वादळ होऊन घोंघावणारा धगधगता अग्निकुंड, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, नितीवंत जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त जगभरात आज मोठा उत्साह साजरा केला जात आहे. 

साडे तीनशे वर्षानंतरही प्रत्येकाच्या मनामनात आणि ह्रदयात रयतेचे राजे म्हणून  मिरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे आजही गायले जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराज की.. म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून आपसूक जय येतं. जणू इथल्या प्रत्येकाच्या धमन्यात, सळसळणाऱ्या रक्तामध्ये शिवाजी आजही जिवंत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 शिवनेरीवर शिवबाचा जन्म!

आज शिवजयंतीनिमित्त प्रत्येक मावळा आपल्या लाडक्या राजाला आदराने नमन करत आहे, वंदन करत आहे. आजही प्रत्येक मावळ्याच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या महापराक्रमी छत्रपतींचे नाव शिवाजी कसे पडले? याबद्दलची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. जाणून घ्या रयतेच्या राजाचा जन्मोत्सवाचा क्षण आणि शिवाजी या नावामागची कथा... 

तारीख होती, 19 फेब्रुवारी 1630. स्थळ शिवनेरी. दुसऱ्या प्रहारचा सूर्य कलला होता. शिवनेरी किल्ल्यावर वाहणारा गार, आल्हाददायी वारा जणू येणाऱ्या सुवर्णक्षणाची चाहूल देत होता.अचानक त्याचवेळी एक दासी धावत आली आणि म्हणाली, सरकार राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागलं.दासीने दिलेल्या बातमीनंतर गडावर एकच धावपळ उडाली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

दिवस सरला, गडावर दिवे लागले. माँसाहेब जिजाऊंच्या खोलीत दास-दासींची गर्दी वाढली. दासीने पुन्हा एकदा आरोळी दिली, सरकार 'मुलगा' झाला.ही गोड बातमी ऐकताच शिवनेरीवर जल्लोष झाला, सगळ्या मावळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जुलमी राजवटीच्या छाताडावर उभा राहणारा सह्याद्री जिजाऊंच्या पोटी जन्माला आला म्हणून गडावर जणू दिवाळीच साजरी झाली. 

शिवाजी नाव कसे पडले?

छत्रपतींचे नाव शिवाजी ठेवण्यामागेही मोठी आख्यायिका आहे. दासायन लेखातील संत रामदास यांच्या संदर्भानुसार, शिवरायांच्या जन्मासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीकडे नवस केला होता. शिवाई देवीने प्रकट स्वरुपात माँसाहेब जिजाऊंच्या अंगात संचार करुन प्रत्यक्ष सांबसदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तो तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे, असा आशीर्वाद दिला होता.

Advertisement

तसेच महाराष्ट्रावरील मुघली आक्रमण धुडकावून लावण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी माझ्या पोटी मुलाचा जन्म व्हावा, माझ्या पोटी मुलाने जन्म घेतल्यास त्याचं नाव आई शिवाईच्या नावावरुन ठेवले जाईल, असा नवस जिजाऊंनी केला होता. त्यामुळेच शिवनेरीवरील शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. या शिवाई देवीला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बहीण मानून साडी-चोळी पाठवल्याचेही उल्लेखही ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये आढळतात. 

ट्रेंडिंग बातमी - Dombivli News: इलेक्ट्रिशन, प्लंबर,लेबर बनले बिल्डर, डोंबिवलीतल्या 'त्या' 65 अनधिकृत इमारतींचे गौडबंगाल

स्वराज्याच्या कार्याला सुरुवात..

शिवनेरीवर जन्मलेल्या शिवरायांनी स्थापनेच्या कार्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. या आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसत्तेसह स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक संकटाशी छत्रपती शिवरायांनी धैर्याने लढा दिला. या महापराक्रमी राजाने आपले संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी आणि माँसाहेबांनी पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहिले. 

Advertisement

शत्रूंनाही मोह वाटणारा रयतेचा राजा:
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या. त्यांनी आपल्या मावळ्यांवर आणि रयतेवर जिवापाड प्रेम केले. जापी-पातीच्या भिंती तोडून सर्वांना समान वागणूक दिली.  छत्रपती शिवरायांची गनिमी काव्याची रणनिती, त्यांची युद्धकौशल्ये, लष्करी धोरणे, याचे त्यांचे शत्रूही कौतुक करत होते. त्यांच्या असामान्य कर्तुत्वामुळे, अतुलनीय पराक्रमामुळे आणि रयतेसाठी आजन्म वाहून घेण्याच्या प्रतिज्ञेमुळे ते देशाच्याच नव्हे तर जगाच्या ईतिहासातील एक महान योद्धे, आणि जाणता राजा बनले. 

ट्रेंडिंग बातमी - महिलांसाठी खुशखबर! 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार, कधी अन् कुठे? जाणून घ्या

अन् स्वराज्य पोरकं झालं!

3 एप्रिल 1680 मध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंघावणारे शिवबा नावाचे वादळ कायमचे शांत झाले. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. एक दक्ष राजा रयतेला पोरका करुन गेला, अवघ्या स्वराज्याला सुतक पडलं. मात्र या राज्याच्या आभाळाएवढ्या कर्तुत्वामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. त्यांनी दिलेला स्वराज्याचा वारसा आजही प्रत्येक जण जगभरात अभिमानाने मिरवत आहे. या थोर, महापराक्रमी, धुरंधर राजाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!