
शहजादी नावाची मुलगी मुळची उत्तर प्रदेशातल्या बांदा इथं राहाणारी. फसवणूक करून तीला दुबईला पाठवण्यात आलं. पण तिथे ती एका षडयंत्राची शिकार झाली, असा आरोप तिच्या पालकांनी केलाय. तिचे आई वडील उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावात राहातात. या शहजादीला दुबईमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला येत्या एक दोन दिवसात फाशीवर लटकवलं जाईल. त्याआधी शेवटची इच्छा म्हणून तिने आपल्या आई वडीलांना शेवटचा फोन कॉल दुबईतल्या जेलमधून केला. त्यावेळी दोन मिनिट जे काही बाप लेकीमध्ये बोलणं झालं ते ऐकून अंगावर काटा येतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही शहजादी सध्या अबूधाबीच्या जेलमध्ये आहे. तिला आता फाशी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा फोन तीने आपल्या आई वडीलांना केला. तुम्ही काळजी करू नका. जे नशिबात आहे ते होणार. तुम्ही केस लढत राहाल पण त्याने काही होणार नाही. हा माझा शेवटचा फोन आहे. यानंतर मी या जगात नसेल. लेकीच्या या बोलण्यावरून तिचे वडील ढसाढसा रडले. मुली तुझ्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही. देवावर विश्वास ठेव काही तरी चमत्कार नक्की होईल असा दिवास तिचे वडील तिला देत होते.
आमच्या मुलीला फाशीच्या आधी वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. आता तिला कधीच फोन करता येणार नाही. ती आम्हाला केस मागे घेण्यासाठी सांगत होती. ती सतत रडत होती. हा कुठला न्याय आहे असं ती म्हणत होती. आम्ही दुबईत जावू शकत नाही. आमच्याकडे तिच्या कुठल्याही केसचे कागदही नाहीत. माझी मुलगी गुन्हेगार नाही. ती निर्दोष आहे. तरही तिला गेल्या दोन वर्षापासून जेलमध्ये ठेवले आहे. आम्ही तिला सोडवण्यासाठी दिल्ली पासून गल्ली पर्यंत फेऱ्या मारल्या. पण आम्हाला कुणीही दाद दिली नाही असं तिचे वडील शब्बीर खान सांगतात.
शहजादीला एक आग्र्याच्या एजंटने दुबईत एका जोडप्याला विकलं होतं. त्यानंतर ती दुबईत त्या जोडप्याच्या घरी काम करत होती. त्यावेळी त्या घरात चार महिन्याचा लहान मुलगा होता. त्याला त्याच्या आईने नियमित डोस दिला होता. मात्र त्यानंतर त्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. त्यामुलाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. तसेच त्याला दफनही करण्यात आले. अशा स्थितीत शहजादीवर त्या मुलाच्या हत्येचा आरोप करण्यात आला असं तिचे कुटुंबीय सांगतात. त्याच वेळी तिच्याकडील मोबाईलही काढून घेण्यात आला. शिवाय तिला जबरदस्तीने आरोप कबुल करायला लावला असा आरोपही तिच्या आई वडीलांनी केलाय.
शहजादीला दुबईत फसवून नेण्यात आलं होतं. लहान पणी तिचा चेहरा जळाला होता. तो दुबईत गेल्यावर उपचारानंतर बरा होईल. शिवाय तिथे चांगला पगार मिळेल असं तिला सांगण्यात आलं होतं. या आमिषामुळे ती दुबईला जाण्यास तयार झाली. पण तिच्या बरोबर भलतचं घडलं. गेल्या दोन वर्षापासून ती जेलमध्ये आहे. आता तिला फाशी होणार आहे. त्यामुळेच तिने शेवटची इच्छा म्हणून आपल्या आई वडीलांना फोन केला होता. ते ही गरिब असल्याने मुलीला मदत करण्यासाठी त्यांनाही मर्यादा पडत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world