अहिल्यानगर: अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी प्रवास तसेच समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा शिव- फुले आंबेडकर महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून 17 एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा' आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना' हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे.
जामखेडमधील जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आमदार शिवाजीराव गर्जेही उपस्थित राहणार आहेत.
नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार
17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता अजितदादा पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजितदादा नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याने राजकीय जुगलबंदी करण्याची शक्यता आहे.
Ujani Dam : पुणे, सोलापूर, अहिल्यानगरवर पाणीसंकट; उजनी धरणाची मृत पाणी साठ्याकडे वाटचाल