
Ujani Dam : महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिनाही उलटला नाही. पाऊस यायला अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. त्यातच महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरणात आता केवळ साडेपाच टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ तीन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर उजनी धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार
पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी असून यांपैकी 63 टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर 54 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 66 पूर्णांक 65 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world