Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकरावर ठाकरे गटाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात, विरोधकांना साथ देणार? 

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका अद्यापही समोर आलेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका अद्यापही समोर आलेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारमधील भाजपसोबतचे घटक पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा लक्ष होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र यामध्ये नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. चंद्रबाबू नायडू यांनी तीन दुरुस्ती सुचवत या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील  काही मुद्द्यांवर JPC मध्ये बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचना नोंदवण्यात आल्या. आता याचा विचार या बिल मांडल्या नंतर झाला आहे का? हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहिलं जाईल. भाजपसोबत असलेले मित्रपक्ष चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांनी जरी या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी चर्चेदरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्या पक्षांची भूमिका काय आहे? हे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहिलं जाणार आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Waqf Amendment Bill : 'वक्फबद्दल चुकीची माहिती पसरवली', इस्लाम धर्माच्या अभ्यासकांकडून 3 महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा

त्यानंतर या विधेयकासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आपली भूमिका मांडणार असल्याचं कळतंय. मात्र या दरम्यान इंडिया आघाडीच्या काल १ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्रित या विधेयकाला विरोध करणार असल्याचे ठरलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने जरी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी या विधेयकाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व लोकसभा खासदारांनी आज लोकसभेत हजर राहून चर्चेत सहभागी व्हावे अशा प्रकारचे व्हीप पक्षाकडून बजावण्यात आलं आहे. 

Advertisement