महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 दशकांपासून ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर 5 जुलै 2025 रोजी वरळीच्या मैदानावर सत्यात उतरताना ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ठाकरे कुटुंबाला अनुभवता आला. 2006 मध्ये विलग झालेले उद्धव आणि राज ठाकरे हे दोन चुलत भाऊ पुन्हा एकदा हातात हात घालून जनतेसमोर आले. हा केवळ दोन भावांच्या भेटीचा सोहळा नव्हता, तर बदलत्या राजकीय परिस्थितीत 'ठाकरे' नावाचा ब्रँड टिकवण्यासाठी केलेली एक खेळी असल्याचे मानले जात आहे. 2013 मध्ये उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून दिलेली साद राज यांनी झिडकारली होती, त्यानंतर 12 वर्षांनंतर अशा कोणती राजकीय अपरिहार्यता निर्माण झाली ज्यामुळे या दोन नेत्यांना एकत्र येणे भाग पडले, हे समजून घेणे गरजेचे आहे.
वारसदार कोण? संघर्षाचे मूळ बीज
या संघर्षाची सुरुवात 1988 मध्ये झाली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत शिंदे यांचा मुलगा राज ठाकरे हे शिवसेनेत सक्रिय झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. चालण्याबोलण्यापासून अनेक गोष्टीत शिवसैनिकांना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसू लागली होती. भाषण, स्वभाव आणि व्यंगचित्र हे तीन पैलू राज ठाकरे आणि बाळासाहेबांना जोडणारे होते. याउलट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे हे त्यावेळी राजकारणापासून काहीसे दूर होते आणि त्यांना फोटोग्राफीची आवड होती. 1990 च्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी पक्षात रस घेण्यास सुरुवात केली आणि बाळासाहेबांनी हळूहळू त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या.
रमेश किणी प्रकरण आणि राज यांची पीछेहाट
23 जुलै 1996 हा दिवस राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा टप्पा ठरला. पुण्याच्या एका सिनेमागृहात रमेश किणी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. किणी यांच्या पत्नीने राज ठाकरे यांच्यावर काही आरोप केले, ज्यामुळेमुळे राज ठाकरे अडचणीत आले होते आणित्यामुळे शिवसेनेची मोठी बदनामी झाली होती. राज यांना सीबीआय (CBI) चौकशीला सामोरे जावे लागले होते. राज ठाकरे यांची या प्रकरणातून कालांतराने सुटका झाली खरी, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आपले स्थान बळकट केले होते. 2003 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरेंनी स्वतःच उद्धव यांच्या नावाचा कार्याध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला, जो मंजूरही झाला. राज ठाकरे हे वरकरणी शांत दिसत होते, मात्र आपल्याला डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात पक्कं घर करून गेली होती.
मनसेची स्थापना आणि राजकीय भूकंप
2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेचा सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) स्थापना केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकून शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडले आणि त्यांना सत्तेपासून रोखले. मात्र, त्यानंतर मनसेची ताकद कमी होत गेली. 2012 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. उद्धव ठाकरे हे आजारी असताना, राज ठाकरे हे स्वत: त्यांना हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले होते. लीलावती हॉस्पीटलमधून परतताना देखील राज ठाकरे हे स्वत: गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. यानंतर हे दोघे एकत्र येतील अशी आशा वर्तवली जात होती, मात्र ती फोल ठरली. राज ठाकरेंनी 2013 साली उद्धव यांचा प्रस्ताव नाकारला होता, पण 2025 साली त्यांनीमहेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःहून युतीसाठी हात पुढे केला होता.
ठाकरे बंधू एकत्र का आले?
आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केले आणि या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेच शिवाय सत्ताही गमवावी लागली. एकेकाळी भाजप हा राज्यात छोट्या भावाच्या भूमिकेत होता, मात्र 2014 नंतर भाजपने मोठ्या भावाच्या भूमिकेत शिरकाव केल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये आधीच दुरावा निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने युती, आघाड्यांसंदर्भातील आपली ताठर भूमिका सोडून दिली होती. ज्यामुळे महाविकास आघाडी तयार होऊ शकली. अर्थात यामागे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा अधिक प्रबळ होती असे बोलले जाते. तर दुसरीकडे, राज ठाकरे यांची मनसेही राजकीय पटलावर गलितगात्र झालेली दिसत होती. दोन्ही ठाकरेंच्या सेनांमधील अनेक नेते पक्ष सोडून गेले. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे दोन्ही ठाकरेंना आपले राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचे जाणवले. 5 जुलै 2025J रोजी वरळीत झालेल्या 'आवाज मराठीचा' मेळाव्यात दोन्ही भावांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्र येऊन विजयाचा जल्लोष केला. भाजपला रोखण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिकेतील मराठी मते टिकवण्यासाठी या दोघांनी आता युती केली असून, आगामी निवडणुकीत हे समीकरण महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकते.
ठाकरे बंधूंची युती गेमचेंजर ठरणार?
मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती मोठा गेमचेंजर ठरेल. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेची मते फोडली होती, ज्याचा फायदा भाजपला झाला होता. आता हे विभाजन टळल्यास महायुतीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. 27 जुलै 2025 रोजी उद्धव यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी मातोश्रीवर घेतलेली भेट ही या युतीवरची अंतिम मोहोर ठरली.