Beed News: मारहाण प्रकरणाने नागरिकांचा संताप! सोमवारी बीड बंदची हाक; 4 मोठ्या मागण्या केल्या

19 मे रोजी परळीकरांच्या वतीने परळी बंदच आवाहन करण्यात आले असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड: बीडच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असं हे आरोपी आपापसात बोलत असल्याचाही समोर आलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ ही समोर आले. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ असून बीड जिल्ह्यात वातावरण तापले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (19मे) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक शांततेत होणार असून बीडच्या नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारण्याचा ठरवले आहे. परळी तालुक्यातील लिंबूटा गावचा तरुण शिवराज नारायण दिवटे याला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 19 मे रोजी परळीकरांच्या वतीने परळी बंदच आवाहन करण्यात आले असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 काय आहेत मागण्या ?

1) शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण केलेल्या गुंडाची संघटित गुन्हेगारी मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

2) परळी मध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळला असून मारहाणीच्या वारंवार घटना घडत आहेत या घटनांना आळा घालण्यात यावा.  

3) या प्रकरणांमध्ये आरोपीवर कठोर कारवाई नाही झाली तर व्यापक जण आंदोलन करण्यात येईल.

4) महत्त्वाचे या प्रकरणांमध्ये जे आरोपी आहेत त्यांची परळी शहरातून धिंड काढण्यात यावी. या मागण्यासाठी  शहर व संभाजीनगर पोलीस स्टेशनला परळीकरांच्या वतीने देण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देणार

दरम्यान, परळी तालुक्यातील लिंबोटा येथील शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी मारहाण झाली होती. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील रुग्णालयात जाऊन पीडित शिवराज याची भेट घेतली. तरुणाच्या दोन गटातील वाद यामुळेच ही हाणामारी झाली.  मात्र या घटनेमध्ये कुठलाही जातीयवाद नाही असा स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

Topics mentioned in this article