Shivsena Crisis: विकासनिधीचा खोटारडेपणा! बंडखोर खासदारांना किती निधी मिळाला? आकडेवारीने खासदारांचा बुरखा फाडला

खासदारांनी केलेला विकासनिधीचा मुद्दा अत्यंत खोटारडा असल्याचे आता समोर आले आहे. या खासदारांना मिळणारा निधी आणि केलेल खर्च लक्षात घेता खासदारांचा हा दावा पोकळ असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, दिल्ली

Operation Tiger UBT MP Vikasnidhi: शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत फुटलेल्या या खासदारांनी विरोधात असल्याने विकासनिधी मिळत नसल्याचे तक्रार करत विकासासाठी पक्ष सोडत असल्याचे कारण दिले. मात्र या खासदारांनी केलेला विकासनिधीचा मुद्दा अत्यंत खोटारडा असल्याचे आता समोर आले आहे. या खासदारांना मिळणारा निधी आणि केलेल खर्च लक्षात घेता खासदारांचा हा दावा पोकळ असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. 

Shivsena Bhavan: मुंबईत शिंदेसेना उभारणार नवे 'सेनाभवन'? ठाकरेंना शह देण्यासाठी 'ही' खास जागा निवडली

कोणत्या खासदाराला किती  निधी अन् खर्च किती झाला?

 संजय दीना पाटीलः  मुंबई

 मंजूर निधी :१४.७ कोटी
निधी खर्चः १५ लाख ५९ हजार
निधी पडूनः १४ कोटी ५४ हजार
कामे किती पूर्णः ४० पैकी एकही काम पूर्ण नाही
म्हणजे १.१ टक्के निधी विकास कामांवर खर्च केला.

संजय जाधवः परभणी लोकसभा

 मंजूर निधी: १४.७ कोटी
निधी खर्चः ३ कोटी ७८ लाख
निधी पडूनः ११ कोटी
कामे किती पूर्णः ५६ पैकी २५ काम पूर्ण
म्हणजे २५.७ टक्के निधी विकास कामांवर खर्च केला.

नागेश आष्टीकरः हिंगोली

 मंजूर निधी: १९ कोटी
निधी खर्चः ५ कोटी ६ लाख
निधी पडूनः १३ कोटी ९५ लाख
कामे किती पूर्णः ७९ पैकी २८ काम पूर्ण
म्हणजे २६.६ टक्के निधी विकास कामांवर खर्च केला.

संजय देशमुखः यवतमाळ - वाशिम

 मंजूर निधी: १८.६ कोटी
निधी खर्चः १ कोटी ४१ लाख 
निधी पडूनः १७ कोटी १४ लाख
कामे किती पूर्णः १०६ पैकी ७ काम पूर्ण केली.
म्हणजे ७.६ टक्के निधी विकास कामांवर खर्च केला.

भाऊसाहेब वाकचौरेः शिर्डी

 मंजूर निधी: १४.७ कोटी
निधी खर्चः ७१ लाख ३० हजार
निधी पडूनः १३ कोटी ९८ लाख
कामे किती पूर्णः १३५ पैकी २ कामे पूर्ण 
म्हणजे ४.९ टक्के निधी विकास कामांसाठी खर्च केला.

Mumbai Rain Alert: कृपया लक्ष द्या! मुंबई, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा इशारा

ओमराजे निंबाळकरः धाराशीव

 मंजूर निधी: १८.५ कोटी
निधी खर्चः १ कोटी ९७ लाख
निधी पडूनः १६ कोटी ४९ लाख 
कामे किती पूर्णः १३० पैकी २१ कामे पूर्ण 
म्हणजे १०.७ टक्के निधी विकास कामांवर खर्च केला.