जाहिरात

Shivsena Bhavan: मुंबईत शिंदेसेना उभारणार नवे 'सेनाभवन'? ठाकरेंना शह देण्यासाठी 'ही' खास जागा निवडली

पक्षाचा राज्यभर विस्तार होत असताना मुंबईत पक्षाचे हक्काचे आणि स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालय असावे, यासाठी योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Shivsena Bhavan: मुंबईत शिंदेसेना उभारणार नवे 'सेनाभवन'? ठाकरेंना शह देण्यासाठी 'ही' खास जागा निवडली

विशाल पाटील, मुंबई:

Shivsena Shinde Group Sena Bhawan:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘सेनाभवन' उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाचा राज्यभर विस्तार होत असताना मुंबईत पक्षाचे हक्काचे आणि स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालय असावे, यासाठी योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Mumbai Rain Alert: कृपया लक्ष द्या! मुंबई, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा इशारा

शिंदेंच्या शिवसेनेचे नवे सेनाभवन

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या ‘सेनाभवना'साठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. यापैकी एक जागा वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून काही अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी जागा दादर परिसरात पाहण्यात आली असून या जागेला पक्ष नेतृत्वाकडून अधिक पसंती मिळत असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा विस्तार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगाने सुरू आहे. नव्या कार्यकर्त्यांची भरती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाचे जाळे अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असताना पक्षासाठी स्वतंत्र मुख्यालय असणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शिवसेना भवनाच्या धर्तीवर नव्या ‘सेनाभवना'ची उभारणी करण्याचा विचार पुढे आला आहे.

दादरमध्येच उभारण्यास प्राधान्य... 

मात्र पक्षातील काही नेत्यांचे मत असे आहे की, मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे मुख्यालय हे दादरसारख्या मराठमोळ्या आणि शिवसेनेच्या परंपरेशी जोडलेल्या भागात असावे. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयांनी व्यापलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलापेक्षा दादरला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे समजते.

दादरमधील जागेबाबत काही तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय बाबींवर सध्या पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. या त्रुटी दूर झाल्यानंतर जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने शहरात पक्षाचे प्रभावी आणि सुसज्ज मुख्यालय उभारून संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Mumbai News: मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! दादर स्टेशनवरील संतापजनक VIDEO; सकाळचा नाश्ता करताना सावधान

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com