Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी! ठाकरेंना सर्वोच्च दिलासा, आजच्या सुनावणीत काय ठरलं?

Shivsena Hearing Supreme Court: ऑगस्टमध्ये मुख्य प्रकरणावर न्यायालय सुनावणी घेणार आहे, त्यामुळं या प्रकरणाचा निकाल या वर्षीच्या शेवटपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, दिल्ली:

Shivsena Party And Symbol Hearing Supreme Court:  तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात भूकंप झाला अन् शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत. तेव्हापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचा? याबाबतचा खटला सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या खटल्यासंदर्भात तारीख पे तारीख असा प्रकार सुरु असल्याने ठाकरे गटाने नव्याने शिंदेंकडे असलेले चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. या संदर्भात आज महत्त्वाची घडामोड घडली.

Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ॲड निरज किशन कौल आणि ॲड मनिंदर सिंह यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली तर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वतीनं ॲड अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल आणि ॲड देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी सुप्री कोर्टाने या प्रकरणाच्या नियमीत सुनावणीबाबत महत्त्वाचे विधान केले. 

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ॲागस्ट महिन्यात सुनावणी होणार असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले, “या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. खूप कालावधी झाला आहे. ॲागस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू.” त्यावर ॲड कपिल सिब्बल यांनी ॲागस्टमध्ये तारीख कोणती असेल ते कोर्टाने सांगावं अशी विनंती केली. तेव्हा सुप्रीम कोर्टाने  तारीख कोणती असेल ते आम्ही रोस्टर पाहून आज संध्याकाळ पर्यंत सांगणार असल्याचे स्पष्ट केले. 

VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं?

नेमका निकाल लागणार कधी?

 या सुनावणीनंतर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.  मुख्य प्रकरणावर ऑगस्टमध्ये सुनावणी आहे. सुनावणी अगोदर जर निवडणुका आल्या तर निवडणुका घेऊ,  दोन ते तीन दिवसात ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊ. असं न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी ऑगस्टमध्ये मुख्य प्रकरणावर न्यायालय सुनावणी घेणार आहे, त्यामुळं या प्रकरणाचा निकाल या वर्षीच्या शेवटपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.