पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पालघर:

पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. भारती कामडी या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पालघर लोकसभा निवडणुकीत उमेदवार होत्या. यावेळी भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत तब्बल चार लाख मतं मिळाली होती.

लोकसभेतही ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं नाव सूचवल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भारती कामडी या पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या महिला संघटिका राहिल्या आहेत. याशिवाय 2020 मध्ये त्यांची पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भारती कामडी यांनी दीड वर्ष काम केलं. 

नक्की वाचा - 'कोण आहे तो...नाव घ्या लिहून,' उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले, BKC वर काय घडले? पाहा Video

भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. पालघरसह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश पार पडला. 

Advertisement