Maharashtra Politics Operation Tiger: महाराष्ट्रासह दिल्लीचं राजकारण ढवळून काढणाऱ्या ऑपरेशन टायगरबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज संसदीय समितीची बैठक बोलावली होती, या बैठकीला फक्त चारच खासदार उपस्थित राहिल्याने पक्षामध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
Operation Tiger: ठाकरेंचे खासदार कुठे लपले? लोकेशन सापडलं? सुरत- गुवाहाटी नव्हे 'या' ठिकाणी मुक्काम
ऑपरेशन टायगर यशस्वी? ठाकरेंचे खासदार फुटले
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिला असून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहाही खासदार अरविंद सावंत यांनी बोलावलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत अनुपस्थित राहिले आहेत. या बैठकीला गटनेते अरविंद सावंत, राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे चारच खासदार उपस्थित होते. त्यामुळे ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंड केल्याचं दिसत आहे.
ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव यांचा समावेश आहे. यापैकी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अद्याप अस्पष्ट असून ते सध्या पुण्यात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठाकरेंचे पळालेले खासदार सध्या जयपूरमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे.
Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'चा एकनाथ शिंदेंना कसा होणार फायदा? राज्यात आणि केंद्रात वजन वाढणार