संजय तिवारी, प्रतिनिधी
जानेवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच पाच वाघांचे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात पाच ते सहा महिन्यांचे दोन बछडे सुद्धा आहेत. हे सारे मृत्यू अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पाबाहेर झाले असून त्यातील काही संशयास्पद आहेत. यवतमाळ येथे सापडलेल्या वाघांच्या मृत देहावरील दात आणि नखे गायब आहेत तर भंडारा जिल्ह्यात वाघाच्या मृतदेहाऐवजी त्याचे तुकडे सापडले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘तलाववाली' ही वाघीण तसेच ‘जंजीर' हा वाघ पर्यटनाच्या या हंगामापासून दिसलेले नाहीत आणि दोघांच्याही पाऊलखुणा किंवा हालचाल पर्यटकांना आढळलेल्या नाहीत. पावसाळ्यापूर्वी त्यांची उपस्थिती होती मात्र आता ते बेपत्ता झालेले आहेत. यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ आणि एक वाघीण बेपत्ता झाले होते. याशिवाय, उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यातून ‘जय' हा वाघ बेपत्ता झाला होता. तर अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ‘माया' ही वाघीण देखील बेपत्ता झाली होती.
नक्की वाचा - Crime news: धक्कादायक! मुख्याध्यापिकेने 10 वीच्या मुलींना शर्ट काढायला लावले अन् म्हणाल्या आता...
वाघांचे मृतदेह कधी आणि कोठे?
2 जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात. सर्व अवयव शाबूत मात्र, मृत्यू संशयास्पद.
6 जानेवारी – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत वाघाच्या मृतदेहाचे तीन तुकडे आढळले.
7 जानेवारी – यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी येथे वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. वाघाच्या मृतदेहाचे दोन दात आणि 12 नखे गायब.
8 जानेवारी – नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह सापडला. उपासमारीने मृत्यू झाल्याचे उघड.
9 जानेवारी – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात पाच ते सहा महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह . मोठ्या वाघाने मारल्याचा संशय.