Reel Star Arun Tupe Death: सोशल मीडिया जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठमोळा रील स्टार अरुण तुपे याचं निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला. या घटनेने मराठी मनोरंजन विश्व, सोशल मीडिया जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या विनोदी रील्सने सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कलाकाराने इतक्या लहान वयात जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या विनोदी शैलीने, अभिनयाने सर्वांना खळखळून हसवणारा मराठमोळा रिलस्टार अरुण तुपे याचं निधन झाले आहे. विनोद तुपे सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. कोण अरुण तुपे नावाचे त्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट होते. त्याचे इन्स्टावर 179K फॉलोअर्स असून नवनवे रिल्सच्या माध्यमातून तो विविध विषय मांडत होता. मृत्यूआधी २२ तासांपूर्वीच त्याने एक रील पोस्ट केला होता. या रीलवर आलेल्या कमेंटवर तो मृत्यूच्या अगदी काही तास आधी रिप्लाय देत होता, अशातच त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय?
अरुण तुपे छत्रपती संभाजीनगरमधील बालाजीनगर परिसरात राहत होता. राहत्या घरातच तो मृतावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयातही दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, अरुण तुपेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटील यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
माझा तरुण मित्र, रिलस्टार अरुण तुपे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या रील्स आणि विनोदी व्हिडिओंमधून हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे प्रसिद्ध रील स्टार आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अरुण तुपे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, भावपूर्ण श्रद्धांजली, असं त्यांनी म्हटलं आहे.
T20 WC 2026: BCCIने खजिना उघडला, विश्वविजेती टीम इंडिया मालामाल; 'इतक्या' कोटींचं बक्षीस जाहीर