जाहिरात

T20 WC 2026: BCCIने खजिना उघडला, विश्वविजेती टीम इंडिया मालामाल; 'इतक्या' कोटींचं बक्षीस जाहीर

ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता बीसीसीआयने विश्वविजेत्या भारतीय संघासाठी खजिना खुला केला असून सर्वात मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. 

T20 WC 2026: BCCIने खजिना उघडला, विश्वविजेती टीम इंडिया मालामाल; 'इतक्या' कोटींचं बक्षीस जाहीर

BCCI Reward Team India For Winning T20 World Cup 2026: न्यूझीलंड संघाला धुळ चारत भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता बीसीसीआयने विश्वविजेत्या भारतीय संघासाठी खजिना खुला केला असून सर्वात मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. 

BCCIने खजिना उघडला, टीम इंडिया मालामाल! 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२६ चा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. या घोषणेसह, बोर्डाने स्वतःचाच मागील विक्रम मोडला आहे. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२४ चा T20 विश्वचषक जिंकला तेव्हा BCCI ने खेळाडूंना १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर बोर्डाने आणखी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवले. या विजयासह भारत हा सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे, त्याचसोबत भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवत तिसऱ्यांदा T20 विश्वचषक स्पर्धा  जिंकण्याचाही पराक्रम केला आहे. टीम अंडियाच्या या कामगिरीने खुश झालेल्या बीसीसीआयने या मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. 

तब्बल 131 कोटी बक्षीस म्हणून जाहीर!

बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाला १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली, त्यांचे विजेतेपद यशस्वीरित्या राखले आणि आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक कायम ठेवणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला.

नक्की वाचा- Rohit Sharma Video: भर मैदानात रोहित शर्मा बायकोवर खेकसला, दोघांची हमरी-तुमरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

"या विजयासह, भारत आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक तीन वेळा जिंकणारा पहिला संघ बनला आणि या स्वरूपाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले. बोर्ड पुन्हा एकदा खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांना सतत यश मिळावे अशी शुभेच्छा देतो."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com