Shocking News: सिझेरियन करताना डॉक्टरांचा निष्काळजीपणा! महिलेच्या पोटात दुखू लागलं, सोनोग्राफीत जे समोर आलं ते..

वारंवार पोटात दुखू लागल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर: प्रसूती दरम्यान शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात कापडी तुकडा राहिल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये घडला आहे. वाशिमच्या रिसोड येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.  वारंवार पोटात दुखू लागल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान  राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे.

Advertisement

सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशीम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखविला तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही पोट दुखतच राहिले अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले तेव्हा तपासणी अंतिम सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप