Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिरातील 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 3 महिन्यांची प्रवेशबंदीही होणार? कारण...

कलम 24 व 25 अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधीही तुळजापूर मंदिरात एका कर्मचाऱ्यानेच दारु पिऊन धिंगाणा घातल्याचे समोर  आले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव: धाराशिवच्या तुळजापूरमधील आई तुळजाभवानी मंदिर प्रशासन विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी पुजाऱ्यांमधील वाद तर कधी चोरीच्या घटनांमुळे या देवस्थानची चर्चा होत असते. अशातच आता श्री. तुळजाभवानी मंदिरातील 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मंदिर परिसरात थुंकल्याने ही नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसात समाधानकारक खुलासा न झाल्यास तीन महिने मंदिर प्रवेशबंदी होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम 24 व 25 अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधीही तुळजापूर मंदिरात एका कर्मचाऱ्यानेच दारु पिऊन धिंगाणा घातल्याचे समोर  आले होते. 

Pimpri Chinchwad Crime: शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

Topics mentioned in this article