मालवण पुतळा दुर्घटना; सिंधुदुर्ग पोलिसांकडून जयदीप आपटेचे घर आणि कारखान्याची झडती

सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक आज आपटे यांच्या कल्याण येथील घरी पोहचले. दुपारी साडे तीन वाजता हे पथक दाखल झाले. या पथकाने साडे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्यांची आई, पत्नी आणि अन्य सदस्यांची चौकशी केली.

Advertisement
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक शिल्पकार जयदीप आपटे याची एकीकडे पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग पोलीस कल्याणला पोहोचले आहेत. पोलीस टीम आपटे याच्या घरात चौकशीनंतर त्याच्या कारखान्यात दाखल झाले. पुतळा तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरले याचा तपास पोलीस करत आहे. आपटे कुटुंबिय आणि शेजारी देखील तपास कामात सहकार्य करत असल्याचे दिसून आले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेच्या दिवसापासून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा पसार झाला होता. त्याने त्या दिवशी त्याच्या कुटुंबियांना तो घटनास्थळी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप होते.

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )

आपटे याच्या अटकेची मागणी विरोधी पक्षांसह शिवप्रेमीकडून करण्यात येत होती. दोन दिवसापूर्वी कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने आपटे हा कल्याणच्या घरी येत असताना त्याला अटक केली. आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आल्यावर त्याला त्याठिकाणी न्यायालयात हजर केले गेले. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक आज आपटे याच्या कल्याण येथील घरी पोहचले. दुपारी साडेतीन वाजता हे पथक दाखल झाले. या पथकाने साडेतीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्यांची आई, पत्नी आणि अन्य सदस्यांची चौकशी केली. या चाैकशीनंतर पोलीस पथकाने आपटे याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेले त्याचे शिल्पालय गाठले. आपटेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले होते हे तपास पथकाने पाहिले.

Advertisement

(नक्की वाचा - मोठा निर्णय! शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू,वस्तू,समाधीचे जतन होणार)

या तपास कामात पथकाला आपटे यांची पत्नी, आई आणि शेजाऱ्यांनी सहकार्य केले. आपटे यांनी छत्रपती महाराजांचा पुतळा त्याच्या शिल्पालयात तयार केला असल्याने पोलिसांनी त्याचे शिल्पालय गाठले. पोलिसांच्या हाती काय पुरावे लागले हे तपास पथकाकडून सिंधुदुर्गच्या न्यायालयात सादर केले जाऊ शकतात.

Topics mentioned in this article