सहा वर्षाच्या चिमुरडीमध्ये मासिक पाळीची लक्षणं,नक्की तिच्या सोबत काय झालं?

आधी वयाच्या 14व्या वर्षी मुलींना मासिक पाळी येत होती. आता हे वय घटून नऊ ते दहा वर्षापर्यंत आल्याचे मदर हूड रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement
Read Time: 2 mins
सातारा:

एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. इथं एका सहा वर्षाच्या चिमुकलीमध्ये मासिक पाळी पूर्वीची लक्षणे आढळून आली आहेत. अचानक या चिमुरडीच्या शरीरात बदल दिसून येत होते. येवढ्या लहान वयात हे बदल कसे काय असा प्रश्न तिच्या पालकांना पडला. त्यांनी तिला तातडीने पुण्यातील दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी काही धक्कादायक निरिक्षण नोंदवलं. यामुळे पालकांनाही धक्का बसला. सध्या या चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सहा वर्षाची चिमुरडी सातारा जिल्ह्यात राहाणारी आहे. ती बालवाडीत जाते. त्याच वेळी तिच्या शरीरात बदल होत असल्याचे दिसून आले. मासिक पाळी येण्या आधी एकाद्या मुलीच्या शरीरात जे बदल होतात ते बदल तिच्यात शरीरात होत होते. आधी पालकांनी लक्ष दिलं नाही. मात्र  ज्या वेळी याचं गांभिर्य पालकांना लक्षात आलं त्यांनी तातडीने तिला पुण्यातील खराडी इथल्या मदरहूड रूग्णालयात हलवलं. डॉक्टरांना ही बाब सांगण्यात आली. डॉक्टरांनी तातडीने मुलीच्या तपासण्या सुरू केल्या. 

ट्रेंडिंग बातमी - एमआयएम मविआचं चाललंय काय? दानवे-जलील यांचे दावे प्रतिदावे

तपासण्या मधून काही गोष्टी समोर आल्या. त्यातली पहिली गोष्ट फार धक्कादायक होती. ही चिमुरडी शेतात वापरल्या जाणाऱ्या  किटकनाशकांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तिच्यातले हार्मोनल बदल झाले होते. त्यामुळे तिच्या शरीरातही आपोआप बदल होत होते, असे निरिक्षण डॉक्टरांनी नोंदवले. त्यामुळे तिला किटकनाशकांपासून दुर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिचं शरीर आता पूर्वपदावर येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लिव्ह इनमधल्या प्रेयसीला मारलं, रिक्षात टाकलं, आईच्या घरासमोर सोडलं, पुढे काय झालं?

या चिमुरडीवर वेळेवर उपचार झाले नसते तर तिला मासिक पाळी सुरू झाली असती असे डॉक्टरांनी सांगितले. बैठकाम करणे, मोबाईलचा अतिवापर, जंक फूड खाण्यावर अधिक भर, शिवाय मैदानी खेळ खेळत नसल्यामुळे मुलींच्या मासिक पाळीचं वय घटलं आहे. आधी वयाच्या 14व्या वर्षी मुलींना मासिक पाळी येत होती. आता हे वय घटून नऊ ते दहा वर्षापर्यंत आल्याचे मदर हूड रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितले. ही बाब पालकांसाठी चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.