जाहिरात

Solapur Fire: सोलापूर अग्नितांडवात मोठी अपडेट! मृतांचा आकडा वाढला, 8 जणांचा दुर्दैवी अंत

Solapur MIDC Fire Update: काही कामगारांसह सेंटर इंडस्ट्रीजचे मालक हे आत मध्ये अडकल्याची माहिती होती त्यानुसार शोधकार्य सुरु होते.

Solapur Fire: सोलापूर अग्नितांडवात मोठी अपडेट! मृतांचा आकडा वाढला, 8 जणांचा दुर्दैवी अंत

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. यावेळी काही कामगारांसह सेंटर इंडस्ट्रीजचे मालक हे आत मध्ये अडकल्याची माहिती होती त्यानुसार शोधकार्य सुरु होते.

मात्र हे पाच जण मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा श्वास गुदमरुर आणि होरपळून मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत

नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार

मृतांमध्ये 5 पुरुष, 2 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. दरम्यान, या घटने ने राज्यात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी महापालिकेची यंत्रणा कमी पडली. वेळोवेळी पाणी कमी पडत होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून खाजगी टँकरद्वारे पाणी मागून घेतला आहे अशी तक्रार करत सखोल चौकशीची मागणी करण्याात आली आहे. 

Bhshan Gavai News: सरन्यायाधीश संतापले, जाहीरपणे नाराजी अन् 3 अधिकाऱ्यांची तात्काळ दिलगिरी, नेमकं काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com